ग्रामगीतेच्या शिक्षणातून सुसंस्कारक्षम विद्यार्थी निर्माण व्हावेत- सुबोध दादा

जामदरी टेकडी येथील बाल सुसंस्कार शिबिराचा समारोप

भोकर( तालुका प्रतिनिधी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आदर्श गावाच्या निर्माण साठी ग्रामगीतेसारखा ग्रंथ लिहिला त्यामध्ये युवकांसाठी आदर्श जीवन, महिलाजागृती असे अनेक विषय असून ग्रामगीतेच्या शिक्षणातून सुसंस्कारक्षम विद्यार्थी निर्माण व्हावेत, संपूर्ण देशात ग्रामगीतेचे विचार रू जावे असे विचार गुरुदेव सेवा मंडळ भूवैकुंठ अड्याळ टेकडी जि. चंद्रपूर येथील संचालक सुबोध दादा यांनी जामदरी टेकडी येथील जीवन शिक्षण विद्यार्थी सुसंस्कार शिबिरात बोलताना मांडले.
अध्यात्म गुरुकुल जामदरी टेकडी येथे दि. 22 ते 29 मे 2026 दरम्यान विद्यार्थी बाल सुसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना,योगासने, शिवकालीन युद्ध कला, दांडपट्टा, तलवार, ढाल, लाठी, काठी,कराटे, भजन,गायन, वादन असे विषय शिकविण्यात आले प्रशिक्षक म्हणून दीक्षा वाघ, दिना मेश्राम, श्रेया चौधरी, राहुल संकपाल, आराध्या कदम यांनी अतिशय सुंदर असे प्रशिक्षण दिले, सुबोध दादा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले 28 मे रोजी सायंकाळी 7 वा. बालसू संस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम झाला अध्यक्षस्थानी चैतन्य बाबा कांडली आश्रम हे होते त्यांनी शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना पाठवून संस्कारक्षम बनवावे असे विचार मांडले प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार बी. आर. पांचाळ, गोविंद पा.कदम, एस. एल.कदम यांनी मनोगत व्यक्त करून अशा शिबिराची आज नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. मुले आणि मुली मिळून 25 विद्यार्थी सहभागी झाले होते त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक सादरीकरण झाले अतिशय सुंदर आणि प्रभावी सादरीकरणाने उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविकात गणेश गुरुजी दुमलवाड यांनी शिबिरा विषयी माहिती दिली सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले ओमकार अवधूत राजुरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स चे वाटप केले या कार्यक्रमास निवृत्त प्राचार्य बंडोजी भोसले, गोपाळ महाराज मूळझरेकर, शेषराव पाटील, उत्तमराव मुंडकर, बापूराव पा.सोनारीकर, नर्मदा आई, निर्मलाताई, प्रकाश मामा कोंडलवार, रामराव बडूरे, गंगाप्रसाद बाशेट्टी, मारुती पा. सोनारी, परमेश्वर इंगळे, हनमनलू बडगर यांच्यासह तालुक्यातील सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन गंगाधर गिरोड गुरुजी यांनी केले राष्ट्रवंदनेने सांगता झाली सर्वांना सहभोजन देण्यात आले

Leave a Reply