मासिक पाळी मासिक स्वच्छता दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

भोकर :- आज दि. २८ मे २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे जिल्हा शल्य चिकित्सक मा.डॉ संजय पेरके साहेब व डॉ. राजाभाऊ बुट्टे सर निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) यांच्या सूचनेनुसार, वैद्यकीय अधिक्षक मा.डॉ.प्रताप चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनानुसार, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, इन्चार्ज सिस्टर उज्वला पवार यांच्या नियोजनानुसार ” मासिक पाळी मासिक स्वच्छता दिन ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा करण्यात आला.
” मासिक पाळी स्वच्छता दिवस ” दरवर्षी २८ मे रोजी ” मासिक पाळी अनुकूल जग ” निर्माण करण्याच्या जागतिक चळवळीचा एक भाग म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीची संकल्पना ” Together for a Period Friendly India” (मासिक पाळी अनुकूल भारतासाठी एकत्रित प्रयत्न ) अशी असून, मासिक पाळी ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे व ती कलंक अथवा भेदभावाचे कारण ठरू नये, हा संदेश या संकल्पनेतून दिला जातो. विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन (Menstrual Hygiene Management MHM) बाबत जनजागृती निर्माण करणे व चांगल्या स्वच्छता पद्धतींचा प्रसार करणे अपेक्षित आहे. याकरिता मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा करण्यात येतो.
मासिक पाळीमध्ये स्वच्छता का महत्त्वाची ? संसर्ग आणि आजार टाळण्यासाठी, शरीर निरोगी ठेवण्यासाठी, आत्मविश्वास वाढण्यासाठी शाळा व कामकाज नियमित सुरू ठेवण्यासाठी.
स्वच्छतेसाठी घ्यायची काळजी.
स्वच्छ सॅनिटरी पॅड / कपडा वापरणे. पॅड वेळेवर बदलणे (४-६ तासांनी ), हात स्वच्छ धुणे, वापरलेले पॅड योग्य प्रकारे टाकणे, स्वच्छ आणि पौष्टिक आहार घेणे.
मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. याबद्दल लाज न बाळगता खुल्या मनाने चर्चा करणे आवश्यक आहे.
“मासिक पाळी स्वच्छता दिवस हा केवळ एक दिवस नसून महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि जागरूकतेचा संदेश देणारा दिवस आहे. चला, गैरसमज दूर करून स्वच्छतेचा संकल्प करू या.” अशी माहिती महिलांना आरकेएसके समुपदेशक सुरेश डुम्मलवाड, आरोग्य सेविका सरस्वती दिवटे, संगीता पंदीलवाड यांनी दिली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत चव्हाण, अधिपरीचारिका श्रीमती साधना भगत, प्रज्ञा धुळे, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, कक्ष सेवीका ज्योती काळे, सुरक्षा रक्षक बाळू पेंडलेवाड व ग्रामीण रुग्णालय भोकरचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..

Leave a Reply