भोकर येथील अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव अध्यक्ष पदी नागोराव शेंडगे बापु तर उपाध्यक्षपदी शंकर डांगरे यांची निवड
भोकर / प्रतिनिधी
• राजमाता-राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सव समिती अध्यक्ष पदी जेष्ठ समाज सेवक नागोराव शेंडगे बापु तर सचिवपदी सुशीलकुमार शिंदे आणि उपाध्यक्ष म्हणून शंकरराव डांगरे, अवधुत पा. ईळेगावकर,सर्जेराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
भोकर तालुक्यातील धनगर समाज बांधवांची बैठक दि.२१ मे रोजी शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शिवसेनेचे सुभाष नाईक किनीकर जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) व्हाइस ऑफ मिडीया नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत ३१ मे रोजी होणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करण्यात येणार असून यासाठी जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली असुन अध्यक्ष म्हणून जेष्ठ नेते नागोराव शेंडगे बापु तर उपाध्यक्ष- शंकर डांगरे, अवधुत पा.ईळेगावकर, सर्जेराव शिंदे थेरबनकर, सचीव- सुशीलकुमार शिंदे देवठाणकर,सह-सचीव- देवबा शिळेकर मुख्य संघटक- नागोराव पा.बिरगाळे, राजेश हाके सह संघटक – खंडोजी गोरे, कोषाध्यक्ष -निलेश चिकाळकर, निमंत्रक – प्रा.बालाजी वरवटे, बळीराम माने, कार्याध्यक्ष-बालाजी हेगडे अशी कार्यकारीणी निवड करण्यात आली आहे.
