हाकेला धावून येणारा व सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणजे नागोराव शेंडगे बापु – एस.पि.हळदेकर
भोकर :सातत्याने आपले आयुष्य दुसऱ्याच्या सुख:दु:खासाठी खर्च करत आजच्या तरुणाईला लाजवेल असे करणारे व एका हाकेला धावून येणारा व सर्व सामान्यांच्या कार्यासाठी झटणारे व्यक्तीमत्व म्हणजे नागोराव शेंडगे बापु होय असे माजी शिक्षक एस.पी .हाळदेकर यांनी व्यक्त केले.
बहुजन तथा ओबीसी नेते,यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख श्री नागोराव शेंडगे बापू यांचा ६९ वा वाढदिवस भोकर येथील शासकीय विश्रामगृहात व्हाईस ऑफ मीडिया व मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एस.पी.हाळदेकर बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाइस ऑफ मिडीया भोकर तालुका अध्यक्ष श्री संतोष रतनवार हे होते.यावेळी जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) व्हाइस ऑफ मिडीया तथा जिल्हा उ-संघटक श्री सुभाष नाईक किनीकर, जेष्ठ पत्रकार तथा उपाध्यक्ष अनील डोईफोडे, बहुजन सामाजिक पॅंथरचे तालुका प्रमुख आषीत सोनुले दिव्यांग सेनेचे तालुकाप्रमुख विठ्ठल देवड यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी नागोराव शेंडगे बापु यांचा केक कापून हार,शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या नंतर अध्यक्षीय समारोप करताना संतोष रतनवार म्हणाले की, तरुणाईला लाजवेल असे आज ही या वयात बापुच कार्य आहे.सह्याद्री सारख्या कड्यासारखे अढळ, गोरगरिबांच्या मनातील वादळ,तुमचे विचार आणि कार्य आमच्यासाठी नेहमीच दिशादर्शक राहो व आपले आरोग्य चांगले राहो अशी अपेक्षा व्यक्त करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार अनील डोईफोडे यांनी केले. सुत्रसंचलन माली पाटील यांनी तर आभार युवानेते राजेश हाके यांनी केले.यावेळी युवानेते नागोराव बिरगाळे, व्यंकटराव पा.शिंदे, सर्जेराव पा.शिंदे,शेख आशिफ,जलील भाई आदी उपस्थित होते.
