Adiwasi kranti Marathi news portal
भोकर(प्रतिनिधी)शहरात मटक्याच्या बुक्या चौका चौकामध्ये थाटण्यात आल्या असून जूगाराच्या नादि लागून गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत,प्रतिबंधित गुटखा देखील भोकर शहरात सर्रास विक्री होत असल्याचे दिसून येते.
भोकर शहरातील गजबजलेल्या मुख्य चौका सह बसस्थानक परिसर मोंढा परिसरात अशा महत्त्वाच्या ठिकाणी मटका बूक्की पहावयास मिळते पोलिसांची नजर चुकवून मटका हा धंदा शहरात गेली अनेक दिवसापासून चालू आहे यामुळे रोजंदारी करणारे मजूर गोरगरीब जनता यांचे संसार उध्वस्त होत आहेत मटका चालवणारे मालक बिनधास्तपणे हा धंदा करीत असून त्यांना कुणाचीही भीती राहिलेली नाही.
भोकर शहर हे गुटखा विक्रीचे मध्यवर्ती केंद्र असून गुटखा साठवण्याचे गोदाम देखील शहरांमध्ये आहेत.गोळी बिस्कीट विक्रीच्या नावाखाली गुटख्याचा धंदा भोकर शहरात फोफावला आहे.गूटखा विक्रेते भरदिवसा आपल्या दूचाकीने शहरात व ग्रामीण भागात गूटखा पार्सल करताना अढळून येतात यावर संबधिताचे अक्षम्य दूर्लक्ष होताना दिसते.यापूर्वी अनेकवेळा गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर धाडी टाकून लाखो रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला होता मात्र भोकर शहरातील गुटखा विक्रीचे केंद्र काही बंद झाल्याचे दिसत नाही गुटखा विक्रेते पान टपरी किराणा दुकानावर मोटार सायकल वरुन गूटखा पुरवठा करतात महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीवर बंदी टाकलेली असतानाही भोकर शहरात मात्र सर्रास विक्री केली जात असताना अन्न व भेसळ निरीक्षक यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, शाळेत जाणारी मुले व युवा पिढी गुटखा खावून त्यांचे आरोग्य बिघडत चालले आहे आरोग्यासाठी घातक असणारा गुटखा शहरात सहजरीत्या कुठेही मिळू लागल्याने युवा पिढी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे शहरातील मटका जूगार व तेजीत सुरु असलेला गुटखा यावर पोलीस यंत्रणेने नियंत्रण ठेवून हा धंदा करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Google Ad