जि.प.शाळा सोनारीचा अमृतमहोत्सव उत्साहात संपन्न.
Adiwasi kranti Marathi news portal
उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील सोनारी जिल्हा परिषद शाळेला 75 वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने शाळेच्या वर्धापन दिना निमित्त सोनारी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष राकेश कडू यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक आदिंनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. या अमृत महोत्सवचे औचित्य साधून सोनारी ग्रामसुधारणा मंडळाच्या वतीने दहावी बारावी व कॉम्प्यूटर इंजिनियर मध्ये प्रथम आलेल्या व पास झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.दक्ष दिपक रसाळ दहावी प्रथम क्रमांक, अक्षता परशुराम कडू इयत्ता बारावी प्रथम क्रमांक,आदित्य कडू कंप्यूटर इंजिनिअर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.गावातील ज्येष्ठ नागरीक व माजी विद्यार्थ्याचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कै.नरेश रघुनाथ कडू यांच्या स्मरणार्थ सोनारी जिल्हा परिषदेतील शाळेत या वर्षापासून इयत्ता 7 वी मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थाला 10000 (दहा हजार रुपये)ची शिष्यवृत्ती देण्याचे सोनारी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष राकेश कडू यांनी जाहीर केले.आपल्या भाषणातून राकेश कडू यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्याध्यापिका पुष्पलता ठाकूर,अलका सुभाष कडू,विजया भक्तराज म्हात्रे,सुनंदा गणेश पाटील,मनिषा दिलीप चव्हाण,श्रीम. वर्षा कडू, भाग्यश्री कडू,करिश्मा कडू,उपाध्यक्ष रविंद्र दामाजी तांडेल,सेक्रटरी साहील कडु,खजिनदार धर्मेंद्र कडु, पंच सुभाष कडु,ग्रामपंचायत सदस्य अंकुश तांडेल,स्कुल कमिटी चेअरमन सुजाता कडु व जेष्ठ नागरीक संघटनेचे पदाधिकारी,ग्रामसुधारणा मंडळ कार्यकारी पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.