शैक्षणिक दत्तक योजनेचा वितरण सोहळा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
Adiwasi kranti Marathi news portal
उरण दि 25(विठ्ठल ममताबादे )माजी आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्थेच्या हिंदू रक्षण मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष दयाळशेठ भोईर यांनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर व कु. कोमल दयाळशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त 62 विद्यार्थ्यांची शैक्षणिक दत्तक योजना जाहीर केली होती. उरण तालुक्यातील पश्चिम विभाग व उरण शहर येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या विद्यार्थी दत्तक योजनेचा वितरण सोहळा शनिवार दिनांक 24 जून 2023 रोजी नवीन शेवा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असलेले माजी आमदार मनोहर भोईर हे उपस्थित होते, यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की , माझे सामाजिक, शैक्षणिक कार्य डोळ्यासमोर ठेवून हिंदूरक्षक मंडळ काम करत आहे. माझ्या वाढदिवसाला त्यांनी ही शैक्षणिक दत्तक योजना व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम केला आहे त्याचे खरोखर मला खूप समाधान वाटते. कारण मला स्वतःला वाढदिवस हा दिवस जनतेसाठी काहीतरी सेवेचा असावा असं माझं स्वतःचं मत आहे. कारण मी स्वतः अतिशय गरीबीतून शिक्षण घेतले.आणि गरिबीमुळे मला पुढच्या शिक्षण घेता आले नाही. याची खंत आजही आहे, ते दुःख माझ्या नवीन पिढीच्या वाट्याला येऊ नये असे मला वाटते, आजच्या शैक्षणिक कार्यक्रमातून चांगला असा संदेश सर्वसामान्य जनतेत गेला आहे, यावेळी उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, द्रोनागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर व मुख्याध्यापक संतोष म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात मनोहरशेठ भोईर यांच्या समाजातील गोरगरीब जनतेसाठी करीत असलेल्या कार्याबदल गौरवोद्गार काढले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाचे शिक्षक प्रशांत म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमात युवा कार्यकर्त्या कुमारी कोमल दयाळ भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
सदर कार्यक्रमाला कु. कोमल दयालशेठ भोईर, उपतालुका संघटक के एम घरत, शहर संघटक किसन म्हात्रे,कामगार नेते गणेश घरत, शिक्षक नेते कौशिक ठाकूर, सोशल मीडिया सेलचे नितीन ठाकूर, अल्पसंख्यांक सेलच्या तालुका अध्यक्ष हुसेना शेख,आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्थेचे खजिनदार परशुराम ठाकूर, संचालक पी डी घरत, पंकज सुतार, किरण राणे, शेखर पडते, ग्रामपंचायत सदस्य भूपेंद्र पाटील सौ वैशाली म्हात्रे, मयुरी घरत, उपशाखाप्रमुख अशोक म्हात्रे, युवासेना मा अधिकारी निलेश घरत, अस्तफ खान, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हात्रे गुरुजी, पंडित सर, पोलीस पाटील,सी मनोहर सुतार शिक्षक वर्ग,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.