Adiwasi kranti Marathi news portal
नांदेड- आपल्या भारत देशाला महापुरुषांचा, समाजसुधारकांचा खूप मोठा वारसा असून ३० सप्टेंबर १९१७
मध्ये मुला- मुलींना शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे त्या काळातील बहुजन उद्धारक थोर कल्याणकारी राजा
म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त
सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.
ते दि. २६ जून २०२३ सोमवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे आरक्षणाचे जनक, जलनितीतज्ञ, महान कल्याणकारी लोकराजा
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४९ वी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी
करण्यात आली. या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी
दुष्काळ, प्लेग, निराधार आश्रम निर्माण, जातीभेद, अस्पृश्यता नष्टसाठी, आंतरजातीय विवाहाला मान्यता,
राधानगरी धरण बांधून शेतकऱ्यांचे उत्थान, ५० टक्के आरक्षण दिले, सर्व समाजासाठी वसतिगृहे, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांना शिक्षणासाठी व मूकनायक वर्तमानपत्रासाठी आर्थिक मदत, कला व साहित्यिकांना राजाश्रय असे
सर्वांगपूर्ण कार्य आपल्या ४८ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केले. अशा महान व्यक्तीमत्त्वाचा आदर्श आपण सर्वांनीच
आत्मसात करुन त्यांचे विचार आणि कार्य तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवून समाजाप्रती देशाप्रती कार्य
करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सर्वप्रथम आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मा.श्री. आनसीराम मडके यांच्या हस्ते छत्रपती
राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी
प्रमुख उपस्थिती म्हणून चार्जमन विष्णुकांत हारकळ, वाहतूक निरीक्षक आकाश भिसे, राजेश धनजकर, एसटी
मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख संभाजी
जोगदंड, नागोराव पनसवाड, वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर, बालाजी घोडके, संतोष देवकांबळे, आनंदा
कंधारे, गुलाम रब्बानी, संदीप जेटी, सुरेश फुलारी, सौ. श्वेता तेलेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शेवटी
नितीन मांजरमकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी आगारातील
कामगार- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad