भोकर ( प्रतिनिधी ) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्त भगवान दंडवे याची काँग्रेसच्या भोकर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्या सह तालूक्यात अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते सिरीमान भगवान दंडवे यांनी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.विविध विधायक कार्यक्रम घेऊन जनजागृती केली आहे काँग्रेस पक्षाप्रतीअसलेली निष्ठा लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी असा आदेश दिल्याने आमदार अमर राजुरकर यांनी सदरील निवडीचे लेखी पत्र पाळज येथील प्रसिद्ध दैवत गणरायाला साक्ष ठेवुन नियुक्ती पत्र दिले आहे निवड होताच विविध स्तरातुन अभिनंदन करून कौतुक केले जात आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्याच्या अतिषबाजी सह ढोल ताशाच्या गजरात दंडवे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे
पक्षाची ध्येयधोरण सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेईल : भगवान दंडवे
#माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझी भोकर तालुका अध्यक्ष पदी निवड केली आहे.यापुर्वि मी काँग्रेस पक्षाला बळ देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली यापूढे या कामात कसलीच कूचराई न करता नागरीकांना सोबत घेवुन प्रोत्साहन देऊन काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील सामान्य नागरीका पर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेईल अशी ग्वाही नुतन तालुका अध्यक्ष सिरीमान दंडवे यांनी दिली आहे