भोकर : विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यास्तव दि.८ ऑगस्ट रोजी भोकर येथे समाज बांधवांची एक महत्त्वपुर्ण बैठक संपन्न झाली व या बैठकीत सर्वानुमते डॉ.अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळ भोकरच्या अध्यक्षपदी अविनाश वाघमारे,तर सचिवपदी चंद्रकांत बाबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा १०३ वा जयंती सोहळा मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात भोकर येथे दि.८ ऑगस्ट २०२३ रोजी समाज भुषण संपादक उत्तम बाबळे यांच्या अध्यक्षतेखाली समाज बांधवांची एक महत्त्वपुर्ण बैठक घेण्यात आली.तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाघमारे,राजन्ना माहूरकर,के.वाय.देवकांबळे,दिलीप वाघमारे,अशोक निळकंठे,के.एम. गोणेकर,पांडूरंग सुर्यवंशी,शिवकुमार गाडेकर,सखाराम वाघमारे,गणपत सुर्येस्कर,बालाजी वाघमारे,अनिल डोईफोडे,श्याम वाघमारे,साहेबराव भालेकर,देवराव मनपुर्वे,बबलू काळे, राहूल शेळके,शंकर दिवटे यांसह बहुसंख्य समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत जयंती सोहळ्याच्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.तसेच हा सोहळा साजरा करण्यासाठी डॉ.अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळ भोकरची कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.

उर्वरित जयंती मंडळ कार्यकारिणी पुढील प्रमाणे,उपाध्यक्षपदी गजानन गाडेकर,रवि किनीकर,सहसचिव साहेबराव झुंजारे,कोषाध्यक्ष सुभाष भालेराव,सहकोषाध्यक्ष शंकर देवकुळे,संघटक अजय गव्हाळे, सहसंघट आकाश भालेराव यांची निवड करण्यात आली.तर सल्लागार म्हणून उपरोक्त सर्व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सदस्य म्हणून सर्व समाज बांधव असतील असे ठरविण्यात आले.यावेळी उपस्थितांनी नव नियुक्त सर्व कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,बस स्थानका समोर भव्य आतिशबाजी करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Google Ad