स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उलवे नोड मध्ये जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व वृत्तपत्र वाचनालयाचे उदघाट्न.

उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )
सध्या उलवे नोड परिसर झपाट्याने विकसित होत असतांना मोठया प्रमाणाने नागरिक उलवे नोड मध्ये वास्तव्यास येत आहेत. अश्यातच नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवा सुविधा दर्जेदार असाव्यात याकडे कटाक्षाने लक्ष देतानाच समाजातील सर्व लहान थोर घटकांना आवश्यक सेवा मिळाव्यात ही भूमिका सुरुवातीपासून जपली असून जेष्ठ नागरिकांसाठी उलवे नोड सेक्टर १६ व १७ येथील विरंगुळा केंद्र ज्येष्ठांना आनंद देईल अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपला विश्वास व्यक्त केला.ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उदघाट्न समारंभ आणि वृत्तपत्र वाचनालय नामकरण समारंभ प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी पप्पुशेठ घरत, युवा नेते कुणाल महेंद्रशेठ घरत,उरण विधानसभा युवक अध्यक्ष, रोहित घरत जेष्ठ नेते आझाद वतारे,कोकण विभाग ओबीसी अध्यक्ष शंभु म्हात्रे,उलवे नोड अध्यक्ष आर आर सिंग,शेखर देशमुख, काशिनाथ कोळी, गव्हाण विभाग काँग्रेस अध्यक्ष अश्विन नाईक, किरण पाटील, आनंद ठाकूर,मयुरेश घरत गोरख कांबळे,जयपाल वाल्मिकी,
अशोक हरणोल,कानराम प्रजापती,शामलाल कोठारी
मोहन राठोड, आनंद ढेकले, मोनीश शेट्टी,संतोष निंबाळकर,
अनिकेत भिंगारदिवे तसेच मोठया संख्येने जेष्ठ नागरिक, महिला,काँग्रेस कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले कि उरण – पनवेल मधील प्रकल्पग्रस्त गावांना व उलवेनोड मध्ये सिडकोकडून पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, उद्यान, मैदाने नागरिकांसाठी आवश्यक सुविधा पुर्ततेकरीता मी नेहमी आग्रही राहिलो आहे असेही ते म्हणाले.उलवे नोड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भेटीगाठींचे, सुसंवादाचे एक चांगले ठिकाण या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याबद्दल नागरिकांनी जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले.यावेळी सेक्टर १६ /१७ मधील चौकास के एन घरत असे नाव देण्यात आले त्यांचे उदघाटन महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Google Ad