संडास व बाधरूमची स्वच्छता करण्याची शिक्षा करणारे जातीयवादी हेमंत पाटील याची खासदारकी रद्द करा : बहुजन समाज पार्टी ची मागणी

भोकर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील डॉ शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यु झाल्या प्रकरणी लोकसभा सदस्य जातीवादी हेमंत पाटील यांनी या रुग्णालयाचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांना स्वतःसंडास व बाधरुमची स्वच्छता करण्याची सक्ती केल्याची विविध सामाजिक माध्यमावर बातमी प्रसारित झाली रुग्णांचा मृत्यु झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना असून याबाबत योग्य ती चौकशी करणे गरजेचेच आहे जेणेकरून भविष्यातील मृत्यु टाळता येतील रुग्णालयात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली असून याबाबत खासदार महोदयानी काहिच चर्चा केल्याचे दिसत नाही. औषधाचा व साहित्याचा तुटवडा, एकाच खाटेवर २ रुग्ण उपचार घेत असतात. काही रुग्ण भरती होतानांच अत्यंत गंभीर असतात तर काही रुग्ण हे इतर रुग्णालयात उपचारासाठी भरती झालेले असतात परंतु उपचारास प्रतिसाद देत नसल्याने संदर्भात शासकीय रुग्णालयात भरती केलेले असतात. या बाबत हे कुठेच बोलताना दिसत नाहित अधिष्ठाता डॉ.वाकोडे हे त्यांच्या पेक्षा वयाने ज्येष्ठ व शासनाच्या एका नामांकित वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता या नात्याने उच्च पदस्थ अधिकारी आहेत.मृत्यु घडलेल्या प्रकाराबाबत चौकशी समितीचा अहवाल आल्यावर त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणे अपेक्षित असताना त्यांच्या प्रतिष्ठेस धक्का पोहचेल व सामाजिक तसेच व्यावसायिक प्रतिष्ठेस बाधक असणारे कृत्य करण्यास भाग पाडून संविधान विरोधी कार्य सत्ते चा माज चढलेला खासदार जातीयवादी हेंमत पाटील यांनी केले आहे त्यांनी या केलेल्या असंसदिय वर्तनाची आपण गंभीर दखल घेऊन त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी राष्ट्रपती महोदया, भारत सरकार ,मुख्य निवडणूक आयुक्त, भारत सरकार, लोकसभा अध्यक्ष, भारत सरकार यांना मार्फत तहसीलदार तहसील कार्यालय भोकर यांच्या कडुन बसपाने निवेदनाव्दारे मागणी केली आहे

Google Ad