अवैध रेती वाहतुकीवर भोकर पोलिसांची कारवाई अवैध रेतीसह टिप्पर जप्त, ७.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
भोकर अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या टिपरवर भोकर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी टिपर चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील व अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दगडू हाके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे
९.५० वाजण्याच्या सुमारास भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुंडेकर कॉलनी ते बोरगाव जाणाऱ्या पांदण रस्त्यावर अवैधरित्या रेती बाहतूक होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात ईवाय ०२६३ क्रमांकाचा टिपर थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे ३ ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीसंदर्भातील कोणतेही रॉयल्टी कागदपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळ त्यामुळे अंदाजे १५ हजार रुपयांची रेती व ७ लाख रुपये किंमतीचा टिपर असा एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जात करण्यात आला. या प्रकरणी दत्तात्रय रघुनाथ पांचाळ (वय ३८, रा. नारवट, ता. भोकर, जि. नांदेड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात
आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजित कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेन्द्र औटे, पोहेकॉ. सोनाजी कानगुले, राजेश घुन्नर, सिद्धार्थ केळकर, साहेबराव हौसरे व बालाजी बुलबुले यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ. सोनाजी कानगुले हे करीत आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित अधिकारी त्र अंमलदारांचे पोलीस अधिक्षकांनी कौतुक केले आहे.
