भोकर येथील पीएमश्री जि.प. केंद्रीय नूतन शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा

फिल्टर पाणी व संगणकीकृत खोलीचे उद्घाटन
*-*-*-***********************
भोकर (तालुका प्रतिनिधी) शहरातील मुख्य ठिकाणी असलेल्या पीएमश्री जि प केंद्रीय नूतन शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून पिण्याचे फिल्टर पाणी संगणकीय खोली आधी सुविधांचे उद्घाटन नगराध्यक्ष भगवाराव दंडवे यांच्या उपस्थितीत 18 एप्रिल रोजी करण्यात आले.
जि. प.केंद्रीय नूतन शाळेचा समावेश पीएमश्री योजनेत झाल्यानंतर शाळेचा चेहरा मोहरा बदलला असून विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देऊन शाळेचा परिसर सुंदर स्वच्छ आणि देखणा बनविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील शाह यांच्या संकल्पनेतून विविध सुधारणा शाळेमध्ये करण्यात येतअसून 18 एप्रिल 2026 रोजी जैन समाज अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था भोकर यांच्या वतीने जागेचे नूतनीकरण टाइल्स बसविणे हे काम करण्यात आले पिण्याच्या शुद्ध आरो पाण्याचे उद्घाटन नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांसाठी संगणकीय खोलीचे व सुंदर असे मुख्याध्यापक कार्यालय तयार करण्यात आले त्याचे हे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले शाळेत घेण्यात आलेल्या संस्कृतीक कार्यक्रमाच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष दिलीपराव सोनवडे, यांचे प्रमुख उपस्थिती होती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील शाह व सर्व शिक्षक वृंदांनी मिळून शाळा सुंदर बनविल्या बद्दल मान्यवरांनी कौतुक केले या कार्यक्रमास मुख्याध्यापक जाधव शिक्षक संकमवाड,बन्सी राठोड, भंडारवार, केंद्रप्रमुख कदम सोनकांबळे, यांच्यासह सर्व शिक्षक वृंद विद्यार्थीहजर होते