उदगीर येथीलअ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने एस.एम.देशमुख यांचा सत्कार
भोकर (तालुका प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथील राष्ट्रीय अधिवेशनात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांचा भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन उदगीर येथे 18 व 19 एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रथम दिवशीच्या उद्घाटन सत्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, संपादक राजेंद्र दर्डा यांचे मार्गदर्शन लाभले. जयदेव डोळे, दिलीप वाघमारे, अरुण कुमार म्हेत्रे यांनी पत्रकारितेचा अनुभव कथन केला. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार रोहित पवार यांची प्रकट मुलाखत घेतली या कार्यक्रमानंतर भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांचा सत्कार करून परिषदेचे कार्य अत्यंत चांगल्या प्रकारे होत असल्याचे उपस्थित पत्रकारांनी मत व्यक्त केले यावेळी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बी.आर. पांचाळ, पत्रकार जयभीम पाटील, शंकर कदम, शिवाजी गायकवाड, सुभाष तेले, डॉ.कैलास कानींदे, मनोज शिंदे, आदींची उपस्थिती होती.
