ममता बॅनर्जी यांच्या चुकीमुळेच पश्चिम बंगालमध्ये भाजपला रस्ता मिळाला , राहुल गांधी यांचा मोठा दावा !

पश्चिम बंगाल मध्ये मतदानाचा पहिला टप्पा सुरू आहे. याच राजकीय रणधुमाळीत काँग्रेस चे खासदार राहुल गांधी यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान करून खळबळ उडवली आहे. त्यांनी बंगाल मधील जनतेला उद्देशून नुकताच एक व्हिडिओ संदेश दिला. या संदेशात त्यांनी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी म्हटले की , जर ममता बॅनर्जी यांनी राज्यात पारदर्शक सरकार चालवले असते आणि ध्रुवीकरणाचे राजकारण केले नसते , तर आज भाजप ला राज्यात एवढी मोठी संधी मिळाली नसती. त्यांच्या या विधानाकडे अनेक भाजप नेते त्यांच्या विजयाची स्पष्ट भविष्यवाणी म्हणूनच पाहत आहेत.

​मतदारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी सांगितले की , ही निवडणूक साधी नसून दोन विचारधारांमधील लढाई आहे. त्यांनी भाजप वर निवडणुका चोरल्याचा गंभीर आरोप केला. यापूर्वी हरियाणा , मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्येही भाजप ने याच पद्धतीने निवडणुका चोरल्याचे ते म्हणाले. एसआयआर ही त्यांची निवडणूक प्रक्रियेतील अफरातफर करण्याची पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या देशभरात काँग्रेस आणि भाजप यांच्या विचारसरणीमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. भारत जोडो यात्रा या मोहिमेतून आम्ही द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्याचा संदेश दिला होता. मात्र , भाजप चे काम हे बंगाल ची संस्कृती , भाषा आणि इतिहासाच्या पूर्णपणे विरोधात आहे.

​राहुल गांधी पुढे म्हणाले की , भाजप चे नेते नेहमी ‘एक देश , एक भाषा आणि एक धर्म’ अशी भूमिका मांडतात. पण आपल्या देशात अनेक भाषा आणि विविध धर्म आहेत. आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत , तर भाजप हेच संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे.

​त्यांनी पुन्हा ममता बॅनर्जी यांना लक्ष करत म्हटले की , जर स्वच्छ सरकार चालवले असते , तर भाजप साठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नसती. आज फक्त काँग्रेस पक्षच भाजप विरुद्ध लढत आहे आणि केवळ काँग्रेस त्यांना रोखू शकते , याची कल्पना स्वतः भाजप लाही आहे , असा दावा राहुल गांधी यांनी केला.

​पत्रकाराचे मत : राहुल गांधी यांचे हे विधान विरोधी आघाडीतील विसंवादावर प्रकाश टाकते. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस मधील हा संघर्ष नक्कीच भाजप ला निवडणुकीत फायदेशीर ठरू शकतो.

​⚠️महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की मेसेज मध्ये संपर्क साधा ! –

​टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) आहे. फोटोच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Leave a Reply