भोकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ता २६ एप्रील रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन; भव्य मिरवणुकीचे आकर्षण

भोकर ( प्रतिनिधी ) शहरात राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंतीनिमित्त रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्र निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक जयंती समिती आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या निमित्ताने रविवारी सकाळी ८.३० वाजता शहरातील विविध बुद्ध विहार ठिकाणी बुद्धरश्मी (पंचशील) ध्वजारोहणाचे कार्यक्रम होणार आहेत. महात्मा फुले नगर येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे डॉ. साईनाथ वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल तसेच शहीद प्रफुल नगर येथील सम्यक बुद्ध विहार संबोधी परिसरात रामराव लोखंडे, पंचशील बुद्ध विहार येथे रमेश गायकवाड, समतानगर येथील अशोका बुद्ध विहार येथे संदीप लोमटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
याशिवाय आंबेडकर नगर येथे गौतम कसबे, अशोक नगर (गंदेवार कॉलनी) येथे डॉ. बालाजी अंदबोरीकर व नगरसेवक अविनाश वाघमारे, पंचशील नगर येथे योगेश भोकरकर व गणेश यशवंतकर,तर इंदिरा नगर येथे संदीप वाघमारे यांच्या हस्ते बुद्धरश्मी (पंचशिल) ध्वजारोहण होणार आहे त्या नंतर सकाळी ९.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नगराध्यक्ष भगवान दंडवे यांच्या हस्ते मुख्य बुद्धरश्मी ( पंचशिल )ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती : तहसिलदार विनोद गुंडमवार, सर्व नगरसेवक व प्रतिनिधी गणेश बोलेवार, साईप्रसाद जटालवार, विठ्ठल धोंडगे, पंकज पोकलवार, योगेश भोकरकर, गणेश यशवंतकर, सुहास पवार, सिध्देश्वर पिटलेवाड, राजेश्वर देशमुख, दिनेश लक्षटवार, सना इनामदार, डॉ. फेरोज इनामदार, दिलीप सोनवाडे, गौतम कसबे, डॉ. बालाजी अंदबोरीकर, अविनाश वाघमारे, संजय घंटलवार,विकास क्षीरसागर,शेख युसुफ भाई, नाजिम शेख,मनोज गिमेकर,विजय पवार अदिची उपस्थिती लाभणार आहे,विविध नगरसेवक,प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत सायंकाळी ४ वाजता महात्मा फुले नगर येथून राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ती शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने बौद्ध बांधव व भारतीय नागरीक सहभागी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या प्रसंगी अन्नदाना सह थंड पेयचा मोफत वाटप होणार आहे या सर्व कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष कपील कांबळे,कार्यअध्यक्ष महेंद्र दुधारे ,संदीप गायकवाड,राहुल सोनकांबळे,सल्लागार साहेबराव मोरे,नगरसेवक प्रतिनिधी गौतम कसबे,देवा हटकर,जयभीम पाटील,मिलींद गायकवाड रेणापुरकर,संतोष डोंगरे,मनोज शिंदे,सतीष जाधव,छोटू सोनकांबळे,संदीप वाघमारे,संदीप लोमटे,प्रतीक कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply