भोकर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा: विविध कार्यक्रमांचे आयोजन (महादेवाचा फोटो)कृषी व पशुप्रदर्शन, कबड्डीचे सामने, किर्तन व कुस्त्या:4 दिवस चालणार यात्रा.
भोकर( तालुका प्रतिनिधी) येथील ग्रामदैवत पुरातन महादेव मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्रीनिमित्त 8ते 11 मार्च 2024 दरम्यान भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून कृषी व पशुप्रदर्शन, कबड्डीचे सामने, कीर्तनाचे कार्यक्रम व महाराष्ट्रातील नामवंत पहेलवानांच्या कुस्त्या होणार आहेत.
भोकर शहराचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले पुरातन काळातील महादेव मंदिराच्या प्रांगणात दरवर्षीच महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरत असते चालू वर्षी8 मार्च ते 11 मार्च 2024 दरम्यान यात्रा भरणार असून 8 मार्च 2024 रोजी कृषी व पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,उद्घाटक तहसीलदार सुरेश घोळवे, प्रमुख अतिथी कार्यकारी अभियंता सा. बां.विभाग प्रशांत कोरे, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, गटविकास अधिकारी माधव केंद्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव आदींची उपस्थिती लाभणार आहे महाशिवरात्री निमित्त रात्री 12 वाजता महादेवाची महापूजा व अभिषेक होईल 9 व 10 मार्च रोजी कबड्डीचे सामने होतील 9 मार्च रोजी रात्री8 ते 10 या वेळात शब्द साधक ह.भ.प. अविनाश दादा भारती घाटनांदुर यांचे कीर्तन होईल 10 मार्च रोजी रात्री 8 ते 10 या वेळामध्ये रामायणाचार्य ह.भ. प .वैजनाथ महाराज थोरात हिंगोली यांचे कीर्तन होईल 11 मार्च रोजी भव्य कुस्त्यांची दंगल होणार असून महाराष्ट्रातील नामवंत पहिलवानांची हजेरी लाभणार आहे, प्रथम बक्षीस 51 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 41 हजार रुपये, तृतीय बक्षीस , 31हजार रुपये, चतुर्थ बक्षीस 21 हजार रुपये, पाचवे बक्षीस 15 हजार रुपये, सहावे बक्षीस 12 हजार 500 रुपये, सातवे बक्षीस 11 हजार रुपये, आठवे बक्षीस 9 हजार रुपये ,नववे बक्षीस 7 हजार रुपये, दहावे बक्षीस5हजार 500व अकरावे बक्षीस 5 हजार रुपये राहणार आहे यात्रेतील सर्व कार्यक्रमांचा भाविकभक्त व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष नागनाथराव घीसेवाड, उपाध्यक्ष भगवानराव दंडवे, कोषाध्यक्ष दिलीपराव सोनटक्के, सचिव बी. आर. पांचाळ, संघटक सतीश देशमुख, आकाश गेंटेवार व सर्व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे