२५ एप्रिल ” जागतिक हिवताप दिन ” तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

भोकर:- आज दि. २५ एप्रिल ” जागतिक हिवताप दिन ” भोकर येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व ग्रामीण रुग्णालय येथे साजरा करण्यात आला.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर येथे डास निर्मूलनाची प्रतिज्ञा व हिवताप विषयक माहिती देण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिपक कदम, हिवताप आरोग्य पर्यवेक्षक मोहन पेंढारे, जी पी वाघमारे, आरोग्य निरीक्षक सुरेश पाईकराव, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, मेडके, समन्वयक अतूल आडे, लेखापाल अशिष मोगले, संतोष तळपते, बास्टेवाड मॅडम, प्रदीप गोधने, गणेश गोदाम, अर्जुन रावलोड हजर होते.
ग्रामीण रुग्णालय भोकर येथे हिवताप डास निर्मूलनाची प्रतिज्ञा व माहिती देण्यात आली. यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण, आरबीएसकेचे डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अविनाश गुंडाले, डॉ अपर्णा जोशी, डॉ ज्योती येनावार, हिवताप आरोग्य पर्यवेक्षक मोहन पेंढारे, सत्यजीत टिप्रेसवार, अधिपरिचारीका राजश्री ब्रम्हणे, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, अनिल गवळी, सुधाकर गंगातिरे, आरोग्य सेविका सरस्वती दिवटे, संगीता
पंदीलवाड, स्वाती सुवर्णकार, भिसे, अंगणवाडी सेविका अर्चना नरवाडे, कांचन कावळे, जयश्री रेखावार, प्रभावती चिंतावार, लक्ष्मी कोरवार, प्रणिता दुधारे, मुनेश्र्वर , गंगुताई नर्तावार, शेख नफिसा, अरुणा इनामदार, तक्षीला हिरे, गोपिका कदम आदी उपस्थित होते.

Google Ad