शासनाने महाराष्ट्रात बंदी घातलेला गुटखा वसमत शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे
वसमत शहरात येथील शिरड शहापूर व पूर्णा येथील गु टखा किंग वसमत शहरात खुले आम प्रशासनाच्या अप्रत्यक्ष सहकार्याने सर्व किरकोळ , ठोक विक्रेत्यांना मानवी आरोग्यास हानीकारक असलेला गुटखा पुडयाचा माल पुरवत आहेत .
‘कुंपनानेच शेत खाल्यास दाद मागावी कुणा कडे’ असी अवस्था झाली आहे. गुटक्याचे माफिया काही तरुण मुलांना सोबत घेऊन वसमत शहरात गुटखा सप्लाय करून देत आहे आणि वसमत येथील काही तरुण मंडळी कुणाला न घाबरता मोटरसायकल वर खुलेआम गुटखा घेऊन वसमतच्या अनेक ठिकाणी सप्लाय करत असुन कॅन्सर ग्रस्त पिढी निर्माण करण्याचे पाप हे गुटखा स्टाकीस्ट ,सप्लायर , सेलर करत आहेत .वसमत शहरात खुलेआम गुटखा विक्री करत असल्याची जोरदार चर्चा चालू आहे अन्न भेसळ व संबंधित अधिकारी गाढ झोपेत असुन संबधीत प्रशासणाने कायदा धाब्यावर बसवुन अर्थीक लाभा ,लोभा पाई विष विकण्याचे काम करणाऱ्यावर कडक कार्यवाही करूण गुटखा विक्री बंद करूण व्यसना च्या आहारी गेलेल्या माणसांना तरूणाईला कॅन्सर ने कुंटुब उध्वस्त होण्या पासुन वाचवावे अशी मागणी जनता करत आहे. गुटखा, या मानव कल्यानकारी बाबी नसुनही प्रशासनातील कर्मचारी ते अधिकाऱ्या पर्यंत अर्थीक लाभ पोहचत असावा या करिता या अकल्याणकारी योजना जोरात चालु आहेत . प्रशासनाचा काहीच धाक राहीलेला नाही याचा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे. लोकसेवकांनी लोकांच्या हिता करिता असलेल्या योजनाना प्राधान्य देणे जनतेला अपेक्षीत आहे परंतू सर्व उलटं होताना दिसत आहे. कडक कार्यवाही करूण गुटखा बंद करूण बिघडणारे वातावरण थांबवावे अशी जनतेची मागणी आहे .