न्याहाळोद येथे १जूनला एकाच वेळेला एकाच दिवशी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा वाढदिवस साजरा होणार-प्रा.मोतीलाल सोनवणे


न्याहाळोद येथील नूतन विद्यालय या शाळेत १९८१ ला १०वी चा बॅचला एकूण ५९ विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थ्यांची जन्मतारीख १/६ प्रमाणे आहे. म्हणून सर्वांच्या वाढदिवस १ जूनला होणार आहे. या धावपळीच्या युगात आपल्यासाठी,आपल्या मित्र मैत्रिणींसाठी एक दिवस मनसोक्त आनंद लुटण्यासाठी,जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, गेट-टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
प्रा.मोतीलाल सोनवणे यांच्या घरी सोमवार दि. १३/५/२०२४ रोजी सकाळी १०.०० बैठक संपन्न झाली. या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले. मयत मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली वाहने,शिक्षकांचा सत्कार करणे, कलिंगड/ पपई कापून सर्वांचा एकाच वेळेला एकाच दिवशी शनिवार दिनांक १/६/२०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाढदिवस साजरा करणे,पुरणपोळी व आंब्याचा रस जेवण करणे, प्रा.मोतीलाल सोनवणे यांच्या घरी कार्यक्रम करणे, सर्वांना फेटे बांधणे, बॅनर बनवणे,मयत मित्र मैत्रिणींच्या घरातील एका मेंबरला आमंत्रित करणे,
या बैठकीला प्रा.मोतीलाल सोनवणे, विष्णू माळी सर, श्रीराम वाघ, छोटू धोबी, वसंतराव शिरसाठ, कृष्णदास कुंभार सर, भालचंद्र अमृतकर, प्रदीप पवार, रूपचंद वाघ, दिगंबर धोंडू अमृतकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad