भरदिवसा पिग्मी एजन्टची पैश्याची बॅग व टॅब जबरीने चोरणारे चोरटे गजाआड ( स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली ची कार्यवाही)
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक .जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात होणारे मालाविरुध्दचे गुन्हे उघड करण्याबाबत पो.नि.श्री विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना वेळोवेळी सुचना देवुन मार्गदर्शन करीत असतात. त्याअनुषंगाने हिंगोली शहरात दि. 10/05/2024 रोजी भरदिवसा हिंगोली शहरातील औंढा ना. रोडवरील ईदगाह मैदान जवळील मस्जीद समोर बंधन बैंक, हिंगोली येथील एक पिग्मी एजन्ट (कॅशीयर) याचे बॅगमधील नगदी 1,12,250/- रूपये व टॅबसह जबरीने चोरी झाल्या संदर्भाने पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तात्काळ छडा लावण्यासंदर्भाने स्था.गु.शा.चे स.पो.नि. शिवसांब घेवारे यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्था.गु.शा. पथकामार्फत सदर गुन्हयाचा समांतर तपास चालु होता.
दिनांक 17/05/2024 रोजी स्था.गु.शा. चे पोलीस पथक पो.स्टे. हिंगोली शहर हद्दीत पेट्रोलींग करीत आरोपीची माहीती घेत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे 1) सयद अब्बु अली रज्जाक, वय 25 वर्ष, रा. मस्तानशाहनगर, हिंगोली व 2) परवेज खान युनुस खान पठाण, वय 22 वर्ष, रा. मस्तानशाहनगर, हिंगोली यांनी एक पिग्मी एजन्ट (कॅशीयर) याचे बॅगमधील नगदी व साहित्य चोरी केल्याचे खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस पथकाने सदरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन, विश्वासात घेवुन आरोपीतांची गुन्हयासंदर्भाने विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व त्यांचेकडुन गुन्हयात चोरलेले नगदी 1,12,250/- रूपये, एक टेंब व गुन्हयात वापरलेली स्कुटी असा एकुण 2,02,250/- (अक्षरी रूपये दोन लाख दोन हजार दोनशे पन्नास) रूपयाचा मुद्देमाल तपासकामी जप्त करून, गुन्हा उघड करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयातील चोरी गेलेला 100% मुद्देमाल रिकव्हर करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मा.अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पो.नि. विकास पाटील, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, किशोर सावंत, महादु शिंदे यांनी केली आहे.