वसमत तालुक्यातील हिवरा (ख़ु) येथे अनुसुचित जाती,जमाती प्रतिबंधात्मक कायदया अंतर्गत गुन्हा दाखल.

वसमत तालुक्यातील हिवरा (खु.) येथील चार जना वर अनुसुचित जाती जमाती अंतर्गत ग्रामीन पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला.
हिवरा येथील रहिवासी असलेले फिर्यादी संकेत सुभाष सदावर्ते याचे चुलत भाऊ साईनाथ व मनोज यांनी त्यांच्या चुलत बहीनीस गावातील गणेश होळकर मो.कॉल करूण त्रास देत असुन त्याला असे करु नको म्हणुन समजावुन सांगु असे ठरवुन काळे यांच्या शेतात भुईमुंग काढणी सुरू असुन गणेश तिथे आहे म्हणुन गेले असता गणेश होनाजी होळकर याला राग आला व या तिघांना जानीव पूर्वक जातीय द्वेषा पोटी जातीवाचक शिवीगाळ करत धक्का बुक्की केल्या नंतर शेतातून गावात येऊन सोबती घेऊण दि.19/5/024 रोजी दु.12:00 च्या सुमारास नागसेन सदावर्ते यांच्या घरा जवळ गणेश होणाजी होळकर ,ॠषीकेश दत्ताभाऊ होळकर, ज्ञानेश्वर निवृती होळकर ,अर्जुन बालाजी होळकर यांनी संगनमत करूण जिवे मारण्याच्या तयारी निसी येऊन संकेत सदावर्ते, साईनाथ सदावर्ते ,मनोज सदावर्ते यांना म्हारडयानो तुम्हाला खतम करुण टाकतो तुमच्या बहीनीला कधीही छेडतो असे म्हणत काठयानी बेदम मारहान करूण जखमी करून दहशत निर्माण केली म्हणुन संकेत सदावर्ते यांच्या फिर्यादी नुसार सा.पोलिस निरिक्षक श्री अनिल कांचमांडे यांनी वरिल घटनेची शहानिशा करूण जातिवाचक शिवीगाळ करूण जिवे मारण्याच्या हेतुने मारहान करणाऱ्यावर भादवी 324,323,504,506,34 अजाजप्रतिबंधात्मक कायदा 3(1) r, 3(1)s,3(2)va अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पूढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी वसमत श्री मारोती थोरात हे करत आहेत.

Google Ad