भोकर (प्रतिनिधी) मागील तीस वर्षांपासून आपल्या दमदार लेखनीतून सामाजिक , राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि ऊपक्षीत घटकांना न्याय मिळवून देत विधायक बातम्यांना प्राधान्य देण्याचे काम भोकर येथील जेष्ठ पत्रकार बाबुराव पाटील यांनी केले आहे.त्यांच्या लिखानाची दखल घेवून “सकाळ ” वृत्तपत्रांनी यंदाचा “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कारांसाठी निवड केली आहे.
तालुक्यात मागील तीस वर्षांपासून बाबूराव पाटील हे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत.पुर्वी त्यांनी विविध वृत्तपत्रात काम करून वेगळी ओळख निर्माण केली आहे.बातम्याचे दर्जेदार लिखाण करून समाजातील उपेक्षित वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आहे.पूर्वी त्याच्या लिखानाची दखल घेवून राज्यस्तरीय, मराठवाडा स्तरीय, जिल्हा स्तरीय, तालुका स्तरीय आणि विविध सामाजिक संस्थानी पूरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे.मागील तीस वर्षांपासून पासून “सकाळ” वृत्तपत्रात भोकर तालुका बातमीदार म्हणून कार्यरत आहेत.दरम्यानच्या काळात त्यांनी बातम्यांच्या माध्यमातून दर्जेदार आणि परिणाम कारक लिखाण करून वेगळी छाप निर्माण केली आहे.त्यांच्या लिखाणाची दखल घेऊन यंदा “सकाळ” नी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला आहे.शनिवारी (ता. १ )जुन रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सकाळच्या २५ व्या रोप्यमहोत्सवी वर्षा निमित्ताने वर्धापन दिन साजरा केला जातो आहे.यावेळी सायंकाळी आठ वाजता संत एकनाथ नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सदरील पूरस्कार वितरण करण्यात येणार आहे.त्याच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन करून जिल्हयात तालुक्यात पाटील यांचे कौतुक होत आहे.