वॉरंट बजावणी विशेष मोहिमेत हिंगोली पोलीसांची उल्लेखनीय कार्यवाही. एकुण (१९) वॉरंट तामिल करून (११) इसमांना पकडुन न्यायालयात हजर केले

वॉरंट बजावणी विशेष मोहिमेत हिंगोली पोलीसांची उल्लेखनीय कार्यवाही. एकुण (१९) वॉरंट तामिल करून (११) इसमांना पकडुन न्यायालयात हजर केले.

मा. पोलीस अधीक्षक हिंगोली .जी. श्रीधर यांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंध व गुन्हेगारांवर वचक रहावे म्हणून विशेष कोम्बोंग ऑपरेशन व प्रतिबंधक कार्यवाही तसेच अवैध धंदे विरोधात विशेष कार्यवाहीची मोहीम राबविली जात असुन त्याच सोबत मा. पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने व मार्गदर्शनात प्रत्येक आठवडयात प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा मा. न्यायालयात साक्षीदार व आरोपी हे वेळेवर समन्स व बॉरंट नुसार वेळेवर हजर व्हावे परंतु असे मा. न्यायालयाकडुन वेळोवेळी समन्स निघुनही तारखेवर हजर न राहणारे व ज्यांचे बायत मा. न्यायालयाकडुन प्राप्त अजामीनपात्र व जामीनपात्र वॉरंट बजावणी बाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

आज दिनांक २९/०५/२०२४ रोजी मा. पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांचे आदेशाने व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी मारोती चोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक विकास पाटील स्था.गु.शा. पोनि नितीन काशीकर यांचे मार्गदर्शनात आज रोजी जिल्हयातील सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत अजामीनपात्र, पोटगी बॉरंट वायत विशेष मोहीम घेण्यात आली सदर मोहीमेत जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी तसेच अंमलदार सहभागी झाले होते.

सदर मोहीमेत विशेष कामगीरी करतांना पोलीसांनी मा. न्यायालयाकडुन अनेक वेळा समन्स निघुनही तारखेवर न्यायालयात हजर न राहणारे व ज्यांच्या वाबत मा.न्यायालयाकडुन अटक वॉरंट निघाले होते असे एकुण (१९) अटक वॉरंट तामील करून त्यापैकी (११) अटक वॉरंट इसमांना पकडून मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

तसेच या नंतर सुध्दा वॉरंट बजावणी मोहिम सतत चालु राहणार असल्याचे मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

Google Ad