जागतिक तंबाखू विरोधी सप्ताह निमित्त पंचायत समिती भोकर येथे मौखिक आरोग्य तपासणी

भोकर :- जागतिक तंबाखू विरोधी सप्ताह निमित्त दि.२८ मे २०२४ रोजी मा. डॉ निळकंठ भोसीकर साहेब, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड व मा. डॉ प्रताप चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार ” जागतिक तंबाखू विरोधी दिन व सप्ताह ” निमित्त पंचायत समिती कार्यालय भोकर येथे मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व समुपदेशन सत्र घेण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी वाघमारे एम .जी,भुरेवाड एस. के.,बलदवा,थडवे, कांबळे ,नरवाडे, ग्रएम्बेल उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली. दंत शल्य चिकित्सक डॉ.मायादेवी नरवाडे यांनी मौखिक तपासणी केली. तसेच मौखिक व दंत आजार होऊ नयेत व झाल्यास काय काळजी घ्यावी तसेच तंबाखूचे दुष्परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी एनसीडी समुपदेशक श्रीमती रेणूका भिसे यांनी संसर्गजन्य रोगाबद्दल समुपदेशन केले. यावेळी आरबीएसकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. व्यंकटेश टाकळकर, डॉ. अविनाश गुंडाळे, डॉ. ज्योती
यन्नावार, डॉ. अपर्णा जोशी ,आरबीएसके आरोग्य सेविका स्वाती सुवर्णकार,वत्सला धुमाळे व ज्योती काळे यांनी सहकार्य केले.

Google Ad