अल्पवयीन मुलांना घेवुन चोऱ्या करणाऱ्या टोळी प्रमुखास ठोकल्या बेडया (स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली ची कार्यवाही)

(हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी)

हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात होणारे मालाविरुध्दचे गुन्हे उघड करण्याबाबत पो.नि.विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना वेळोवेळी सुचना देवुन मार्गदर्शन करीत असतात. त्याअनुषंगाने हिंगोली शहरात मागील पंधरा दिवसापुर्वी एका शेतक-याची 40 हजाराची बैंग चोरून नेल्या संदर्भाने व एका वृध्द महिलेची रोख रक्कमेची पर्स वोरून नेल्या संदर्भाने पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुन्हे दाखल होते. सदर गुन्हयाचा समांतर तपास सपोनि. शिवांब घेवारे यांचे पथक करीत होते.

दिनांक 19/06/2024 रोजी स्था.गु.शा.चे पोलीस पथक हिंगोली शहरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, हिंगोली शहरातील पैश्याची बॅग लिफ्टींग करणारे व वृध्द महिलांना गाठुन पर्स चोरी करणारी एक टोळी असुन सदर टोळी प्रमुख दशरथ चंदु शिंदे, वय 45 वर्ष, रा.अण्णाभाऊ साठे नगर, हिंगोली हा आहे. सदर आरोपीने हिंगोलीत काही अल्पवयीन मुलांना सोबत घेवुन चो-या करायला लावतो अशी माहिती मिळाल्यावरून टोळी प्रमुख दशरथ चंदु शिंदे यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने शेतक-याची पैश्याची बॅग व वृध्द महिलेची पैसे व दागीने असलेली पर्स चोरी केल्याचे कबुल करून स्वतःच्या हिश्याला आलेले चोरीतील मुद्देमाल रोख 14,000/- रूपये व मोबाईल असा एकूण 15,000/- रुपयाचा मु‌द्देमाल काढून दिला. सदर आरोपीस अटक करून, पो.स्टे. हिंगोली शहर येथे हजर केले आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मा.अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पो.नि.श्री विकास पाटील, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार नितीन गोरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.

Google Ad