आंबेडकर चळवळीतील स्वाभिमानी बुलंद नेतृत्वांचा विधानसभेसाठी विचार व्हावा

हिमायतनगर – संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीची तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी विचारांची चळवळ यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने जी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नेतृत्वशील कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली त्या फळीला कुठेही तोड नाही.नांदेड जिल्ह्यातील हदगाव सारख्या तालुक्यातून देशाच्या राजकारणामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे तसेच लोकसभेमध्ये भल्या भल्या विद्वानांना आपल्या विचार सामर्थ्याच्या माध्यमातून घाम फोडणारे निळ्या झेंड्याचे नांदेड जिल्ह्याचे पहिले खासदार हरिहरराव सोनुले यांचा कार्यकाळ जर सोडला तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील मतदार संघामध्ये कोणत्याही मतदारसंघांमध्ये आंबेडकरी चळवळीतील नेतृत्व उभारू शकले नाही नांदेड जिल्ह्यातील तालुका परंतु हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघा चा आपण विचार करू या विधानसभा मतदारसंघात कोणत्याही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा किंवा नेतृत्वाचा कोणत्याही राजकीय पक्षाने कधीच लोकसभा किंवा विधानसभा तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंघाने
निवडणुकीसाठी विचार केला नाही हे एक उपेक्षित सत्य आहे असेच म्हणावे लागेल.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची मोठी साखळी आहे कारण या संपूर्ण मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी तसेच झुंजार व्यक्तिमत्व असे नामवंत आंबेडकर चळवळीतील नेते आहेत. परंतु आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने आंबेडकरी चळवळीतील या कार्यकर्त्यांचा विधानसभेसाठी किंवा इतर निवडणुकीसाठी कधीच विचार केला नाही हा मात्र संशोधनाचा विषय आहे.कारण हदगाव विधानसभेचे राजकारण दोन ते तीन घराण्यांच्या भोवतालीच फिरते.थोडक्यात आपण चळवळीतील नेत्यांचा इतिहास पाहूया!
हदगाव विधानसभा मतदारसंघातील आंबेडकरी चळवळीतील नेतृत्वाचा विचार करत असताना यामध्ये पहिले नाव येते ते म्हणजे सुनील हरिहरराव सोनुले संपूर्ण हदगाव मतदार संघावर त्यांच्या विचारांचा प्रभाव आहे, माजी खासदार स्व. हरिहरराव सोनुले यांचे पुत्र असल्यामुळे आंबेडकरी चळवळीतील सर्वच समाज सुनीलदादा सोनुले यांच्याकडे आदराच्या भावनेने पाहिले जाते सुनील दादा सोनुले यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या पर्यंत देखील मजल मारली आहे.हदगाव शहराचं उपनगराध्यक्ष पद त्यांनी भूषवले आहे तसेच शहराच्या विकासामध्ये त्यांचं मोठ योगदान आहे शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. हदगाव तालुक्यात शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात त्यांचं कार्य नाविन्यपूर्ण आहे.विविध सामाजिक क्षेत्रातील उपक्रम राजकीय कार्यक्रम तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुनील दादा सोनुले यांचे योगदान उल्लेखनीय आहे.परंतु सुनील दादा सोनुले हे किमान एकदा तरी आमदार असायला हवे होते असं मत आहे.परंतु झालं गेलं गंगेला मिळालं यापुढे सुद्धा जेव्हा आंबेडकरी चळवळीतील नेतृत्वाचा त्याच्या उदयाचा विचार पुढे आला किंवा उमेदवारीचा विचार पुढे आला सुनील दादा सोनुले या ठिकाणचे नेतृत्व कटाक्षाने पुढे यायला पाहिजे.आगामी होणाऱ्या विधानसभेला इतरांची घराणेशाही झुगारून
काँग्रेस पक्षाने सुनील दादा सोनुले यांना उमेदवारी द्यावी अशी आंबेडकर चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील आंबेडकर चळवळीतील दुसरे महत्त्वाचे नाव म्हणजे दादासाहेब शेळके भिम टायगर सेना या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्तत्वाची छाप दादासाहेब शेळके यांनी टाकली आहे.समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार यांना पॅंथर पद्धतीने दणका देऊन समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य दादासाहेब शेळके हे करत आहेत.कोणत्याही वैऱ्याला भिडण्याचे सामर्थ्य दादासाहेब शेळके यांच्यामध्ये आहे.सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दादासाहेब शेळके यांचे भरीव योगदान आहे नांदेड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादासाहेब शेळके भीम टायगर सेनेच्या माध्यमातून पोहोचलेलं व्यक्तिमत्व आहे.समाजासाठी विविध माध्यमातून आंदोलने विविध ॲट्रॉसिटीधारकांचे प्रकरणे दादासाहेब शेळके यांनी गाजवली आहेत आणि दादासाहेब शेळके यांनी आपल्या अंगावर अनेक केसेस घेतलेले आहेत आणि समाजासाठी अविरतपणे ते लढा देत आहेत दादासाहेब शेळके यांचा सुद्धा आत्तापर्यंत विधानसभेसाठी कोणत्याही राजकीय पक्षाने विचार का केला नाही हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.
हदगाव विधानसभा मतदारसंघातील हिमायतनगर तालुक्याचा विचार केला असता या तालुक्याचे सुद्धा आंबेडकर चळवळीमध्ये मोठे योगदान आहे.हिमायतनगर तालुक्यातून सुद्धा अनेक नावाजलेल्या नामावंत आंबेडकर चळवळीतील नेतृत्वाने चळवळीचे काम केले आहे.यामध्ये कटाक्षाने विचार जर केला असता एका नावाचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावाच लागेल ते म्हणजे गंगाधर वाघमारे वडगावकर हे आंबेडकर चळवळीतील बुलंद व्यक्तिमत्व १९९४ पासून व त्याच्या अगोदरही गंगाधर वाघमारे यांनी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते१९९५ ला हदगाव हिमायतनगर विधानसभेला भारिप बहुजन महासंघाने जाकेर चाऊस यांना उमेदवारी दिली जाकेर चाऊस यांचा प्रचार गंगाधर वाघमारे आणि त्यांच्या सर्व टीमने स्वतः पायी फिरून स्वतः घरची भाकर खाऊन तन-मन-धनाने त्यांचा प्रचार केला होता हे सुध्दा एक समाजातील स्टार प्रचारक होते
व लोकप्रिय नेतृत्व म्हणून ते उदयास आले होते.गंगाधर वाघमारे यांनी विविध आंदोलने पक्षासाठी मोर्चे संघटन बांधणीचं काम पक्ष वाढवण्याचा ध्यास त्यांच्यात होता यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या चांगलेच मर्जीतले कार्यकर्ते म्हणून ते पुढे आले तसेच विविध सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःला त्यांनी वाहून घेतल
हिमायतनगर तालुक्यातील
आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून गंगाधर वाघमारे यांच्या नेतृत्वांचा उदय झाला.हिमायतनगर तालुक्यात भारिप बहुजन महासंघ ही चळवळ जिवंत ठेवण्याचे एकमेव माध्यम जर कोणता असेल तर ते गंगाधर वाघमारे आहेत भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष असणारे गंगाधर वाघमारे सुद्धा कधीच विधानसभेच्या उमेदवारी पर्यंत पोहोचू शकले नाही किंवा पक्षाने त्यांच्या नावाचा विचार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा केला नाही हाच या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील सच्चा विचाराचा पराभव मानायला पाहिजे.
लोकपारंपरिक शाहीर कला संवर्धन मंडळ संस्थापक अध्यक्ष,माधवराव पाटील जवळगावकर मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष,डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संस्थापक, बहुजन टायगर युवा फोर्स चे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांचेही आंबेडकरी चळवळीत भारदस्त काम आहे.गेल्या २३ वर्षापासून ग्रामीण भागातील उपेक्षित कलावंत यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करत आहेत.हिमायतनगर भूषण पुरस्कार २००१ पासून २०१७ पर्यंत अनेकांना सन्मानित केले.त्रिरत्नकुमार भवरे हे हिमायतनगर तालुक्यात जेष्ठ पत्रकार आहेत तसेच सोनारी फाटा येथे राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद अनेक वर्षापासून घेतात.मराठी पत्रकार संघाचे ते तालुका अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ महत्वाचा होता.तसेच बहुजन टायगर युवा फोर्स अंतर्गत अनेक सामाजिक कार्य केली आहेत.साप्ताहिक वारसदार, साप्ताहिक वृत्त वारसदार, साप्ताहिक हिमायतनगर क्राईम या वर्तमानपत्राचे संपादक असून पत्रकारितेत त्यांनी विशेष ठसा उमटवलेला आहे.जेष्ठ कलावंतासाठी मानधन मिळवून देण्यासाठी अनेकदा उपोषण, आंदोलन व मोर्चे देखील त्यांनी काढले. अनेक कलावंताना पेन्शन मिळवून दिली.नांदेड जिल्ह्याभरासह हिमायतनगर तालुक्यात आंबेडकरी चळवळीत त्यांचे मोलाचे कार्य आहे.यांनाही संधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
2019 नंतर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उदय झाला वंचित बहुजन आघाडीचा उदय झाल्याच्या नंतर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे हदगाव चे माजी तालुकाध्यक्ष देवानंद पाईकराव
देवानंद पाईकराव यांनी संपूर्ण हदगाव तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा हा अभिनय राबवला बाळासाहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून जनसामान्य लोकांमध्ये लोकप्रियता मिळवली आंबेडकर चळवळीतील एक निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून देवानंद पाईकराव यांच्याकडे पाहिले जाते संपूर्ण तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे समाजासाठी विविध आंदोलने समाजासाठी मोर्चे निवेदने हा त्यांचा नित्याचाच भाग आहे शांत संयमी आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणून देवानंद पाईकर यांच्याकडे पाहिले जाते
देवानंद पाईकराव हे आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहेत
वंचित बहुजन आघाडी या पक्षाने
स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा विचार करून व आयात केलेला उमेदवार न देता यावेळी तरी देवानंद पाईकराव यांच्या नावाचा विचार करावा आणि आंबेडकरी चळवळीतील उमेदवारी न मिळण्याचा जो वनवास आहे तो संपवावा हीच माफक अपेक्षा आहे.
हदगाव हिमायतनगर तालुक्यातील युवा नेतृत्वाचा विचार करणे सुद्धा महत्त्वाचा आहे यामध्ये राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून
संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेले तसेच विविध सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा ज्यांनी उमटविला असे युवा नेतृत्व बोधिवृक्ष कदम हे सुद्धा चळवळीतील महत्त्वाचा घटक आहेत.राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे.समाजासाठी कुणालाही भिडण्याची क्षमता असलेले बोधिवृक्ष कदम यांच्या सुद्धा नावाचा आगामी विधानसभेसाठी विचार करण्यात यावा अशी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे.स्वतःच्या पायाला भिंगरी बांधून समाजाच्या हितासाठी समाजाच्या प्रचार प्रसारासाठी बोधी वृक्ष कदम नित्य आपले कार्य करत असतात युवकांची फळी त्यांच्याकडे आहे.याचा निश्चितच निवडणुकीमध्ये फायदा होईल. हिमायतनगर तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तसेच आगामी विधानसभेसाठी इच्छुक असणारे विशाल हनवते हे सुद्धा एक स्वाभिमान नेतृत्व आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ प्रभावशाली आहे.सामाजिक राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रांमध्ये त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे समाजासाठी विविध ठिकाणी उपोषणे आंदोलन मोर्चे निवेदने ही त्यांच्यासाठी नित्याचीच बाब आहे. समाजाच्या कार्यासाठी विशाल हनवते हे सुद्धा कुणालाही भिडण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये ठेवतात आगामी विधानसभेला पक्षाने उमेदवारी दिल्यास ते निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत हे मात्र सत्य आहे.. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून विशाल हनवते यांची कारकीर्द ऐतिहासिक आहे.त्यामुळेच त्यांचा सुद्धा उमेदवारीसाठी विचार व्हावा ही एक निष्णांत अपेक्षा आहे.
आंबेडकर चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार
सुभाष दारवंडे यांचे सुद्धा कार्य चळवळीसाठी उल्लेखनीय आहे.भारिप बहुजन महासंघाच्या प्रचार प्रसारात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.तसेच पळसपूर नगरीचे सरपंच मारोती वाडेकर यांचेही नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांचेही आंबेडकरी चालवलीतले कार्य वाखानण्याजोगे आहे. नांदेड जिल्ह्याचा कन्हेया कुमार म्हणून प्रसिद्ध असलेले वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाअध्यक्ष धम्मा वाढवे आंदेगावकर यांचेही नाव आंबेडकरी चळवळीत अग्रस्थानी आहे.त्यांनी विद्यार्थी चळवळी मध्ये सक्रिय कार्य केले आहे.याच बरोबर वंचित चे सक्रिय कार्यकर्ते माजी तालुकाअध्यक्ष रविराज दूधकावडे यांचीही वर्णी यात लावावी लागेल. मातंग समाजातील जेष्ठ कार्यकर्ते संतोष हातवेगळे यांचेही आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय कार्य आहे.तसेच वंचित बहुजन आघाडीचे विद्यमान तालुका अध्यक्ष गोविंद गोखले यांनाही यात समाविष्ठ करावे लागेल. यांचप्रमाणे जवळगाव नगरीचे सरपंच गनपतराव नाचारे यांनाही संधी देणे गरजेचे आहे.
आंबेडकर चळवळीतील वरील सर्व नेतृत्वाचा विचार केल्यास प्रत्येक नेतृत्व हे उपेक्षित राहिलेले आहे.आगामी होणाऱ्या हदगाव – हिमायतनगर विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी घराणेशाही झुगारून आंबेडकरी चळवळीतील नेतृत्वास संधी द्यावी आणि आंबेडकर चळवळीतील नेतृत्वाला तो खरा न्याय असेल कारण बौद्ध समाजाने तसेच आंबेडकर चळवळीतील इतर समाजाने केवळ प्रस्थापितांना फक्त मतदान करायचं आणि घराणेशाहीच्या माध्यमातून थोपावलेल्या उमेदवारास डोळे झाकून निवडून देणे कुठे तरी हे आता थांबलं पाहिजे हीच माफक अपेक्षा आहे..

Google Ad