पांडूर्णा घाटातील महामार्गाच्या कामात मुरुमा ऐवजी लाल माती व दगडांचा वापर..गुतेदार करत आहे निश्कर्ष दर्जाचे काम
(बांधकाम विभागाचे दुर्लक्ष]
भोकर: प्रतिनिधी
भोकर मुदखेड महामार्गावर डोरली फाट्या दरम्यान व पांडुरणा घाटात सुरू असलेल्या राज्य महामार्गाच्या कामात कंत्राटदाराकडून मुरूम-गिट्टी ऐवजी माती व मोठ मोठया दगडाचा वापर केला जात असतानाही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने परिसरातील नागरिकांत संताप व्यक्त होत आहे
मुदखेड-भोकर राज्य महामार्गाचे काम “शारदा कंट्रक्शन अँड कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनी कडुन सुरू आहे. वनविभागाच्या परवानगी अभावी पाडुरणा घाटात व डोरली फाट्याजवळील रखडलेले काम दरम्यान वनविभागाच्या परवानगीनंतर सुरू करण्यात आले असून या रस्त्याचे काम लवकर उरकण्याच्या नादात लाल माती व दगडांचा वापर केला जात आहे ते एस्तीमेटला धरून नाही. या रसत्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून या बाबत भोकर येथील बांधकाम विभागास कळवुन देखील कुठल्याच प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नाही असा रोष परिसरातील नागरिकांत व्यक्त होत आहे.मातीमिश्रीत साहित्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च करून तयार होणारा रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होत आहे. कंत्राटदारांच्या या गैरप्रकारकडे संबंधित विभाग “अर्थकामाईच्या” नादात डोळ्यावरती पट्टी बांधून झोपेचे सोंग घेत आहे .लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पांडूर्णा घाटात चालू असलेल्या कामावर मुरूम टाकण्यासाठी कमी रॉयल्टी भरून आधिकचा गौण खानिज काढण्यात आले. तक्रारी नंतर तहसील विभागाकडून कार्यवाहीसाठी पंचनामे करताच कंट्रोल दादा कडून सदर कामावर माती आणि दगडाचे वापर सुरू करण्यात आले आहे. पंचनामे नंतर तहसील विभाग काय कार्यवाही करेल हे अस्पष्ट आहे. तूर्तास तालुक्यात महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून मोठया प्रमाणात गौंणखनिज चोरल्या जात आहे. यावर कधी प्रतिबंध येईल याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे