मौ कुदळा येथील स्वर्ण व्यक्तींवर ॲट्राॅसिटीचे गुन्हे दाखल.

उमरी :- किशन सटवाजी गायकवाड हे मौ. कुदळा ता. उमरी जि. नांदेड येथील रहिवासी असुन जातीने मातंग समाजाचे आहेत .त्यांचे कुटुंबात पत्नी, दोन मुल, सुनबाई व एक नात कुटुंबात इत्यादी एकत्र राहत असुन त्यांचे कुटुंबात कुणालाही शासकीय किंवा निमशासकीय नौकरी नसल्यामुळे रास्त भाव दुकान व शेती वरच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित आहेत व पुरवठा विभागाच्या नियमाप्रमाणे सर्व योजनेतील राशन कार्ड धारकांना धान्य वाटप करीत असुन. पंचवीस वर्षात त्यांच्या दुकाना विरोधात एकही राशन कार्ड धारकांची तक्रार नव्हती. परंतु 2020-21 मध्ये ग्रामपंचायत निवडणुक लढवुन निवडुन आल्यामुळे व मराठा स्वर्ण व्यक्तीचे शेती विकत घेतल्यामुळे त्यांचे नातेवाईक रामेश्वर माधवराव जाधव, पंजाब माधवराव जाधव व बालाजी माधवराव जाधव इत्यादींनी गायकवाड यांचा दावा धरलेला असुन आम्हाला न विचारता आमच्या नातेवाईकांची शेती मांगाने कसा विकत घेतला आहे. तो राशन दुकानावरच कमाई करीत आहे म्हणून यांचा सुड उगविण्याकरीता राशन दुकानाचे निमित्त पुढे करून त्यांच्याकडे असलेले रास्त भाव दुकान रध्द करण्यासाठी मराठा जातीच्या बायका – मुलांना मांगाच्या दाराला राशनचे धान्य आणायला जावावे लागत आहे. त्याचे दुकान रद्द केले पाहिजे. मराठा समाजात असा जातिभेद पसरवून त्यांना संघटित करून 2021 साली मा तहसीलदार उमरी व मा. जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांचेकडे विनाकारण खोटी तक्रार करुन मराठा जातीच्या प्रस्थापित लोकप्रतिनिधी मार्फत संबंधित अधिकाऱ्यांवर दबावतंत्र टाकून राशन दुकान रद्द केले होते. व ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या नाराज लोकांना हाताशी धरून गायकवाड व गायकवाड यांच्या मुलांवर प्राणघातक हल्ले करण्यास लावून सत्ता त्रास देत होते.
परंतु गायकवाड यांनी पुरवठा उपाआयुक्त छ. संभाजी नगर व जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांच्या शासन दरबारी अडीच वर्षे पाठपुरावा करून सुद्धा संबंधित अधिकारी यांनी गायकवाड यांना न्याय दिला नव्हता म्हणून मा. ना. छगन भुजबळ पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे दाद मागितल्यावर यांची दखल घेऊन गायकवाड यांना मा पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पुन्हा राशन दुकान बहाल केलेले आहे.यांच्या आदेशानुसार मा. जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी माहे मार्च 2024 पासून पात्र राशन कार्ड धारकास ई पॉस मशीनवर अंगठे घेऊन धान्य वाटप करावे असे हमीपत्र लिहून घेऊन धान्य वाटप करण्याची परवानगी दिली होती. या नियमांचे पालन करून गायकवाड मार्च 2024 पासून धान्य वाटप करीत आहेत. परंतु आम्ही मांगाच्या दुकानावर धान्य उचलार नाही व गावातील लोकांनाही धान्य घेण्यास जाऊ देणार नाही. असा जातीभेद करून आमच्या बाजूच्या 248 राशन कार्ड धारकांचे राशन कार्ड दुसरीकडे मराठा जातीच्या दुकानदाराकडे कार्ड जोडावे अशी मागणी करून गायकवाड यांच्या दुकानावर मराठा स्वर्ण व इतर दलित लोकांनी बहिष्कार टाकलेला असून गायकवाड यांचा व कुटुंबाचा सामाजिक, मानसिक व आर्थिक छळ करणे समाजकंटका मार्फत हल्ले करणे, त्रास देणे, जातीवाचक व अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमक्या देऊन तीन वर्षापासून अन्याय, अत्याचार चालूच होते . त्यांच्या मागे स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधीचा हात असल्यामुळे गायकवाड यांचा पिछा सोडायला तयार नव्हते म्हणून सदरील अति त्रासाला कंटाळून मराठा जातीच्या लोकापुढे एकट्याचा काहीही निभाव लागणार नाही. म्हणून गायकवाड यांनी गरिबा करिता असलेले मोफत धान्य श्रीमंत व धनदांडग्या व्यक्ती लाटत आहेत. त्यांचे राशन कार्ड शुभ्र राशन कार्डात वर्ग करावे व धान्य बंद करून आतापर्यंत घेतलेल्या धान्याचे बाजार भावा प्रमाणे वसुली करावे अशी मागणी मा. तहसीलदार उमरी व मा. जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांच्याकडे मागणी केल्यामुळे तहसीलदार उमरी यांनी मंडळाधिकारी सिंधी मार्फत चौकशी करण्याबाबत पत्र काढले होते. त्या सदर पत्राची प्रत व 248 राशनकार्ड धारकांची यादी रामेश्वर जाधव यांनी हस्तगत करून गावातील लोकांना दाखविल्यावर सदरील जातीयवादी समाज कटंक गायकवाड यांच्यावर चिडुन जाऊन मांगाने आमची संपत्ती व मालमत्ता सरकारकडे उघड कसा केला आहे म्हणून दि. 15/07/2024 रोज सोमवारी ठीक 9 च्या सुमारास कुदळा राशन दुकानासमोर 50 ते 60 मराठा व दलित कार्ड धारक जमा होऊन आमच्या विरोधात तक्रार का दिलास “मांगडग्या” अशी जातीवाचक व कमरेच्या खाली आई बहीणीवर अश्लील शिवीगाळ केले असून “यापुढे तू धान्य वाटपाचे काम केल्यास तुला ठार मारण्यात येईल तुझ्या बाजूने गावात एकही माणूस नाही. तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला खतम करून बेपत्ता केल्यावर आमचे कोणीही वाकडे करून घेणार नाही.” अशी धमकी दिल्यामुळे गायकवाड यांनी त्यांच्या भितीने घाबरून जाऊन दि. 25/07/2024 रोजी उमरी पोलीस ठाण्यात जाऊन 1) रामेश्वर माधवराव जाधव 2) पंजाब माधवराव जाधव 3) बालाजी माधवराव जाधव 4) रावसाहेब निवृत्ती जाधव 5) शिवाजी रामराव जाधव 6) शंकर भाऊसाहेब जाधव 7) नामदेव देवराव नावंदे 8) कचरू संभाजी जाधव 9) अंबादास ज्ञानोबा जाधव 10) किशोर सुदाम जाधव 11) रमेश विठ्ठल जाधव 12) पांडुरंग रावसाहेब जाधव 13) पांडुरंग रावसाहेब जाधव 14)बालाजी संगया मठपती,15,) व्यंकटी माधवराव जाधव,16) वलीसाब बबनसाब, 17) रामचंद्र विठ्ठल वानखेडे 18) बालाजी लिंगोजी बट्टेवाड इत्यादी स्वर्ण व्यक्ती व 19) राजू सुटवा गायकवाड 20) पिराजी नागोबा गायकवाड 21) शिवाजी भुजंगा गायकवाड 22) आनंदा पांडुरंग भेरजे 23) संतोष वामन भेरजे 24) साहेबराव बाबु भेरजे 25) सुधीर शंकर भेरजे 26) नागोराव तुकाराम भेरजे 27) नारायण पुंडलिक गायकवाड इत्यादी दलित व्यक्ती राहणार बाबानगर कुदळा येथील असून त्यांचे विरुद्ध दि. 25/07/2024 रोजी रात्री 22:54 वाजता किशन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सदरील 18 मराठा सुवर्ण जातीच्या लोकांवर अनुसूचित जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार अट्रसिटीचे कलम 3(1)(r), 3(1)(5), 3(2)(va) व नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 प्रमाणे 7(1)(d), भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 351(2), 351(3), 189(2), 352, 296 इत्यादी गुन्हे दाखल केले असून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रशांत संपते धर्माबाद हे तपास करीत आहेत.

Google Ad