भोकर तालुक्यामध्ये ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची घटना :- भोकर पोलीसात गुन्हा दाखल”आरोपी पोलीसांच्या ताब्यात “
भोकर ( प्रतिनिधी ) एका तरुणाने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील मौजे पाकी या गावी ग्रामीण भागात घडली आहे मुलीच्या आईच्या तक्रारी वरून भोकर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत ॲट्रासिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्या नराधम आरोपी बळीराम उर्फ बाळू संतोष चव्हाण याला अटक केली आहे.
थोडक्यात माहिती अशी की.तालुक्यातील ग्रामीण भागात एका तरुणा कडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे या नराधम तरुणाच्या विरोधात भोकर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत ॲट्रासिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्या नराधमास अटक केली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की,पीडित मुलगी ही अदिवासी समाजाची आहे तिची आई घरी आल्यावर ती ८ वर्षीय मुलगी घराच्या कोपऱ्यात बसून रडत होती आईने विचारल्यानंतर मुलीने सांगितले की, काकाच्या घरी खेळण्यासाठी गेली परंतू काकाचे घर बंद होते म्हणून ती परत आपल्या घराकडे येत होती तेंव्हा काकाच्या घरा शेजारी राहणाऱ्या बळीराम उर्फ बाळू संतोष चव्हाण याने तिला माझे दुकानातुन सामान आणून दे म्हणून आपल्या घरात नेले आणि दार बंद केले व अत्याचार करून बलात्कार केले एवढेच नाही तर ही बाब आईला सांगितली तर आईची हत्या करेन अशी धमकी दिली मात्र आईला हा सारा प्रकार सांगितल्यानंतर आई च्या तक्रारी वरून भोकर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत ॲट्रासिटी ॲक्ट भारतीय न्यायिक संहिता ( बी एन एस ),२०२३ -६५(२) ,भारतीय न्यायिक संहिता ( बी एन एस ), २०२३ – ३५१ (१) ,भारतीय न्यायिक संहिता ( बी एन एस ), २०२३ – ३५१ (३) ,बालकांचे लेंगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ -४ ,लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, ६ ,बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२-१२, अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ३(१)(w)(i),अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ३(१)(w)(ii) ,अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ ३(२) नुसार गुन्हा दाखल करून आरोपी बळीराम उर्फ बाळू संतोष चव्हाण याला अटक केली आहे पुढील तपास चालु आहे