प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे यांना मंगळवार दिनांक १०/९/२०२४ रोजी आदिवासी विकास संघाचे पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक २८,२९ व ३० वर असलेल्या धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी, ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार या आदिवासी कोळी जमातीच्या लोकांना योजनांचा लाभ मिळाला पाहिजे कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधानानुसार ४७ जमाती आदिवासींमध्ये मोडतात.वरील आदिवासींना कोणत्याही आदिवासी योजनांचा लाभ मिळत नाही म्हणून त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा.कोरोना काळात आदिवासींना चार हजार प्रमाणे खावटी देण्यात आली. त्या दोन हजार रुपये रोख दोन हजाराच्या किराणा होता. मंजूर झाल्यावर देखील बऱ्याच लोकांना या योजनेचा लाभ मिळालाच नाही त्याची पूर्ण चौकशी करून सर्वांना लाभ देण्यात यावा.शबरी घरकुल मध्ये जे लाभार्थी आहेत त्यांचे प्रस्ताव धुळे प्रकल्प कार्यालयात प्रलंबित आहेत ते प्रस्ताव त्वरित मंजूर करावीत.आदिवासी शिकलेल्या मुलांची प्रकल्प कार्यालयात नाव नोंदणी करावी त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासींसाठी जेवढ्या योजना राबवल्या जातात त्या सर्व योजना वरील आदिवासींना देण्यात याव्यात. अशी चर्चा करण्यात आली.यावेळी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे,धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, धुळे तालुका संपर्कप्रमुख दिलीप शिरसाठ, मधुकर सोनवणे, सुरेश काकुळदे, दगा चव्हाण, निंबा शिरसाठ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad