अकोला येथे सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य दिव्य मिरवणूक…

अकोला येथे सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य दिव्य मिरवणूक भीम नगर जुने शहर मधून काढण्यात आली होती..मिरवणूक मध्ये महिला लेझीम पथक युवा लाटी काठी व आखाडा पथक तयार करण्यात आले होते मिरवणुकीमध्ये सर्व लेझीम खेळणाऱ्या महिलांना निळे फेटे बांधण्यात आले होते. मिरवणूक मध्ये संत दरबार हा बँड ठेवण्यात आला होता.ट्रॅक्टर मध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीने डेकोरेशन करून पंचवर्गीय भिक्खूंना धम्म उपदेश देताना देखावा दाखवण्यात आला होता तसेच गांधीजीला जीवनदान देणारी सही लाइटिंग मध्ये तयार करण्यात आली होती तो पुणे करार झालेला हा देखावा सुद्धा मिरवणुकीमध्ये दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये दाखवण्यात आला होता अंगुलीमाल व भगवान बुद्धांचा रोल तिसऱ्या ट्रॅक्टर मध्ये करण्यात आला होता.सम्राट अशोकाची प्रतिमा घोड्याच्या रथ बग्गी मध्ये ठेवण्यात आली होती,अतिशय चांगल्या पद्धतीने हे देखावे तयार करण्यात आले होते व विशेष रॅलीमध्ये पूर्ण निळा कलरचा एक घोडा आणला होता. ज्यावर भीम नगर असे नाव व सम्राट अशोक सेना असे नाव लिहिले होते हा घोडा मिरवणुकीचा मुख्य आकर्षण ठरला,अनेक वर्षापासून असलेली परंपरा भीम नगरातून हे मिरवणूक वाजत गाजत लेझीम लाठीकाठी खेळत काढण्यात आली प्रत्येक चौकात या मिरवणुकीचे विशेष स्वागत करण्यात आले तरी मिरवणुकीमध्ये मिरूणूक नियंत्रण करणाऱ्या सर्व भिम नगरातल्या युववर्गांनी या मिरवणुकीला संरक्षण दिले व सर्व महिलांनी चांगल्या पद्धतीने लेझीम खेळून मिरवणूक शेवटपर्यंत नेली.खऱ्या अर्थाने या भीम नगर मधून आंबेडकर चळवळ आजही टिकून ठेवण्याचे काम अनेक लढवय्ये भीमसैनिकांनी केले होते त्यांनी समोर नेला रथ आम्ही तो आणखी समोर नेण्याचा प्रयत्न करतो यासाठीच हे मिरवणूक आम्ही दरवर्षी काढण्याचा संकल्प केला आहे तरी या मिरवणुकीत ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या सहकार्यामुळेच आज एवढी मोठी मिरवणूक यशस्वी झाली. तुमचे सर्वांचे सहकार्य असेच माझ्यासोबत राहो हेच तथागता चरणी प्रार्थना व हे मिरवणूक अशीच टिकून राहावं हेच अपेक्षा..!!.सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य.!!आकाश दादा शिरसाट,

Google Ad