काल रात्री 1 वाजेच्यासमोरास एका चार चा की वाहनात १२ लाख ५० हजार रुपये सापडले आहेत. जप्त
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा पैशाबाबत अधिक तपास सुरू .भोकर -विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भोकर तालुक्यातील पाळज या ठिकाणी स्थिर पथकाकडून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेच्यासुमारास एका चार चा की वाहनात १२ लाख ५० हजार रुपये सापडले आहेत. जप्त केलेली रक्कम तहसील कार्यालयाकडे जमा केली असून रक्कमेचा निवडणुकीशी संबंध आहे की, नाही याची माहिती प्राप्त झाली नसून पोलीसांनी या बाबत आयकर विभागाला तपासणी करण्याचे सुचविले आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक च्या अनुषंगाने भोकर विधानसभेत मतदार संघात दोन ठिकाणी स्थिर नियंत्रण पथक लावण्यात आले असून तेलंगणा सीमेलगत असलेल्या पाळज येथील बंदोबस्तासाठी लावण्यात आलेल्या स्थिर सहनियंत्रण पथकाने दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजीमध्यरात्री १ वाजेच्यासुमारास एम.एच.२० सी.एच.४३३४ स्विफ्ट डिझायर कंपनीची चार चाकी गाडी हिमायतनगर कडून पाळज मार्गे भैसा (तेलंगणा) कडे जात असतांना थांबून येथे कार्यरत पोलीस अंमलदार जेकुट, राठोड, केंद्र प्रमुख ग्रामपंचायत अधिकारी यु.व्ही. केंद्रे, एम.एन.शेख, बी.डी.कनोजवार हे वाहनांची तपासणी करत असतांना या गाडीमध्ये पाठीमागील सीटच्या पायदानाजवळ नायलॉन पोत्याची तपासणी केली असता त्यात १२ लाख ५० हजार रुपये होते. स्थिर सहनियंत्रण पथकाने याचा पंचनामा तयार करून या गाडीमध्ये विजय बाबु चव्हाण (४२) रा. कांचली ता. किनवट, सुरेश सर्जेराव मोरे रा. छत्रपती संभाजीनगर, संतोष काशीनाथ अंभोरे (४१) रा. पेडगाव ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर असे तिन व्यक्ती होते.पोलीसांनी या रक्कमेची माहिती आयकर विभागाला दिली आहे. पैसे कोणाचे आहेत, कोणाकडे जात होते , या पैशाचा निवडणुकीची काही संबंध आहे का ? याबद्दलचा अधिक तपास निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.