अवैधरित्या मुरमाचे उत्खनन करणारे3 हायवा व1जेसीबी पोलिसांनी पकडले; तहसील कार्यालयास अहवाल सादर
उपविभागीय पोलीस अधिकारी आमना यांची कारवाई
भोकर( तालुका प्रतिनिधी)तालुक्यात गेली अनेक दिवसापासून मुरुमाचे रात्री बेरात्री अवैधरित्या सर्रासपणे उत्खनन केल्या जाते बाजूच्या तालुक्यातील रेती सुद्धा मोठ्या प्रमाणात आणून विक्री केल्या जाते याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर भोकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नफकत आमना यांनी 26 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:30 वाजता थेरबन शिवारात अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करणारे3 हायवा व 1 जेसीबी पकडून भोकर पोलीस स्टेशनला जमा केले व तहसील कार्यालयाला अहवाल सादर केला आहे.
भोकर तालुक्याचा रात्री बे रात्री अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून चोरीच्या मार्गे विक्री करण्याचा प्रकार गेले अनेक दिवसापासून चालू आहे व बाजूच्या मुदखेड व उमरी तालुक्यातून रेतीची वाहतूक सुद्धा रात्री बे रात्री चोरट्या मार्गाने केली जाते अनेक वेळा रेतीचे ट्रक पकडण्यात आले व मुरुमाचे ट्रक सुद्धा पकडण्यात आले होते मात्र चोरीचा धंदा करणाऱ्या लोकांनी आपले काम चालूच ठेवले आहे याबाबत भोकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नफकत आमना यांना माहिती मिळाल्यावरून 26 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 4:30 वाजता त्यांनी थेरबन शिवारात जाऊन अवैध रित्या मुरुमाचे उत्खनन करणारे 3 टिप्पर व 1 जेसीबी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले व पुढील कारवाईसाठी तहसीलदार भोकर यांच्याकडे अहवाल सादर केला.
तहसीलदार विनोद गुंडमवार यांना याबाबत माहिती विचारली असता ते म्हणाले माझ्याकडे अवैध मुरूम उत्खनन केल्या बाबतचा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे अवैध उत्खनन करणाऱ्या 3 टिप्पर व 1 जेसीबी यांचे चालक व मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली