न्याहाळोद येथे गरीब,गरजू विद्यार्थ्यांना वह्या,पेन वाटपआदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष.
प्रा.मोतीलाल सोनवणे न्याहाळोद ता.जि.धुळे येथील लहान मुलांना निशुल्क (फी न घेता) मुलांना शिकवतात अशा गरजू व गरीब विद्यार्थ्यांना न्याहाळोद येथे रविवार दिनांक १०/११/२०२४ राजेंद्र एकनाथ जिरे पोलीस उपनिरीक्षक यांनी स्वखर्चाने क्लास मधील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप केल्या.या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.मोतीलाल सोनवणे यांनी केले होते.
या कार्यक्रमाला आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे,प्राचार्य बाळासाहेब नंदन सायन्स कॉलेज धुळे,प्राचार्य एम.एच पाटील धुळे, पर्यवेक्षक आर.बी जिरे (मराठा बोर्डिंग धुळे) ग्रंथपाल श्री.जे.डी सोनवणे धुळे,माजी सरपंच कैलास पाटील न्याहाळोद, बापू सोनवणे कौठळ,आदिवासी विकास संघाचे धुळे तालुका संपर्कप्रमुख दिलीप शिरसाठ, विवेक काकुळदे,निंबा सैंदाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.