उमरी येथील मोंढा मैदानामध्ये अशोकरावांची एंट्री विरोधकांची वाजली घंटी..
नायगाव मतदारसंघात राजेश पवार यांचा बोलबाला….
आमदार राजेश पवार यांची विकासाची कारर्कीद पहाता महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला आमदार पाहीलो – अशोकराव चव्हाण ………..
उमरी ता प्रतिनिधी कैलास सोनकांबळे / महाराष्ट्राचे राजकारण करीत असताना अनेक हेवेदावे होतात पण आमदार राजेश पवार यांनी नायगाव मतदार संघात जे विकास कामे केलीत ते विकासमुख आणि आभ्यासू आमदार आहे असा आमदार महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतिहासात पाहिला आहे अशा विकास करणाऱ्या राजेश पवार यांना व लोकसभेला संतुका हंबर्डे याना कमळाच्या निशाणीचे बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराना प्रचंड मतानी विजयी करा
असे अव्हाण माजी मुख्यमंत्री तथा विद्येमान राज्यसभेच खासदार अशोकराव चव्हाण यांनी उमरी भाजपा महायुती च्या जाहीर सभेत केले आहे
या सभेला प्रमुख मार्गदशन अध्यक्ष अशोकराव चव्हाण , नायगाव विधानसभा उमेदवार राजेश संभाजी पवार , लोकसभा उमेदवार संतुका हंबर्डे याचे प्रतिनिधी सुनिल हंबर्डे , उदोगपती मारोतराव कवळे गुरुजी , राजेश कुंटुरकर, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी , ॲड भाऊसाहेब देशमुख । गोरठेकर , शासकीय गुतेदार संजीव सवई, डॉ विक्रम देशमुख , माजी नगराध्यक्ष विजुअप्पा उतरवार ,बापुसाहेब पाटील कौडगावकर , प्रसिद्ध व्यापारी म खाज्यासेठ , सुभाष पेरेवार, श्रीनिवास अनंतवार , किशोर पबितवार , ज्ञानेश्वर पा कदम , अविनाश पा कदम , डॉ अमोल ढगे , नानू नाईक कवडीकर , शाहीर जन्टल ,राजेश मनुरकर , आदी मान्यवर उपस्थित होते .
प्रस्ताविक मध्ये संजय कुलकर्णी म्हणाले अशोकराव चव्हाण राजेश पवार, कवळे गुरुजी एकत्र आल्यास लोकसभा / विधान सभेचा विजय निश्चित झालाच पण जि प पं स नगर परिषदीच्या निवडणुकीत कोणत्याही माईचा लाल उतरला विजयी होवू शकत नाही एवढी मोठी शकती आता निर्माण झाली आहे अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले ज्याना दुधाचे दात पुटले नाही असे लोक छोट्याशा पदावर राहून उडया मारतात असे अनेक मोठे पद मिळवून ही मी महाराष्ट्राचे अनेक पदे मिळवून विकास केला आहे माझ्या विरोध्धकांना अजुन सांगायचे आहे अशोकराव चव्हाण अभी जिंदा है माझ्या मागे विकास आणि जनता आहे माझ्या जीवावर आणि हिम्मतीवर निर्णय घेतला ते जनतेसाठीच राजकारणात चढउतार हेवादावे होत असतात मोदी हे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यांचे कार्य विकास निरंतर विकास आहे म्हणून मोदीजीवर विश्वास आहे नांदेड जिल्हातील लोक स्वाभीमानी आहेत त्यांना विकास नेतृत्व कळते अशोकराव चव्हाण यांना मुक्त करणे भाषा बोलणे पोरखेळ आहे
पुढे अशोकराव चव्हाण म्हणाले जिल्हात सोयरे धायरे काका नाते जपून मतदान करू नका ओटींग क्रास करू नका नांदेड जिल्हातील नऊ विधानसभा आणि एक लोकसेभेचे महायुतीचे उमेदवार प्रयंत मतानी विजयी करून मोदी सरकारचे हात बळकट करावे असे आवाहन केले आहे .
आमदार राजेश पवार यांनी माझ्या विरोद्धात प्रचार करणारे लोक विकासाचा मुदावर फोकस न करता खोके घेवून विरोध्धक वेगळा प्रचार करीत आहेत मी सर्वच महापुरुषांचा वारसा विचार आदर करून मतदार संघात कामे केली आहेत गेल्या निवडणूकीत नेत्रदीपक विकासाची कामगिरी केली त्यांचा लेखा जोखा मी सांगण्या पेक्षा जनतेसमोर माझा विकासाचा आरसा आहे
आमदार राजेश पवार पुढे म्हणाले लग्न करण्यासाठी नवरदेव कसा आहे त्यांची खांदन संपती तपासतो नौकरीला आहे की नाही तो बेकार आहे का हे पाहून तपासून मुलगी देतो तस तुम्ही नायगावचा विकास केला की नाही कोण करू शकतो हे मतदारानी तपासावे उग खोके प्रचार करून पाडापाडी चे राजकारण करून दहशदवादी घुसघोराना थारा देवू नका असा ही जोरदार प्रहार राजेश पवारानी केली आहे .
उदोजक कवळे गुरुजी यांनी माझे राजेश पवार यांचे कांही गैर आहे असे गैर समज करून न घेता महायुतीच्या दोन्ही उमेदवाराना निवडणून द्या असे ठणकावून सांगितले आहे राजेश कुंटुरकर यांनी एमलसी ला गोरठेकर हे कुंटुरकराना वचन दिलेला शब्द पाळला नसुन हे शब्द पाळणारे नाहीत तर वेळ प्रसंगी टाळणारे घराणे आहे असे अप्रत्यक्ष टिका गोरठेकर घराण्यावर केली आहे . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मनुरकर तर आभार ज्ञानेश्वर कदम यांनी केले आहे .