१०० दिवसीय क्षयरोग मोहीमेचे ग्रामीण रुग्णालय भोकर येथे उदघाटन व सुरुवात..
नांदेड :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज दि. ०७/१२/२०२४ पासून १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहीम भोकर तालुक्यात व शहरात राबविण्यात येणार आहे. टीबी हरेल, देश जिंकेल. सदर मोहीम दि.7 डिसेंबर 2024 रोजी सुरू होऊन दि. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन 2025 रोजी संपणार आहे.
सदर मोहीमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षय रुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटका पर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोग विषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांचेकडुन पोषण आहार कीटचे वाटप करणे असा असून सदर मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणी करीता तसेच १०० दिवसीय क्षयरोग मोहीमेमध्ये सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा व सन २०२५ पर्यंत नांदेड जिल्हा क्षयमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, डॉ सतिश कोपूरवाड जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांनी शहरी व ग्रामीण भागातील काम करणारी आरोग्य यंत्रणा व नागरिकांना केले आहे.
१०० दिवसीय क्षयरोग शोध मोहीमेमध्ये जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे नि-क्षय शिबीर, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरीत, ऊस तोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
आज ग्रामीण रुग्णालय भोकर येथे बाह्य रुग्ण विभागात रुग्णांना क्षयरोग विषयी, मोहीमची माहिती देण्यात आली व मोहीमची सुरुवात करण्यात आली. मोहीमला लागणारे स्पुटम व साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी डॉ नितिन कळसकर, डॉ पुरंदर, क्षयरोग पर्यवेक्षक विजय क्षीरसागर, संतोष तळपते, जागृती जोगदंड, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, शिवप्रसाद जाधव, प्रल्हाद होळगे, सुरेश डुम्मलवाड, जाहेद अली, नामदेव कंधारे, अनिल गवळी, मुक्ता गुट्टे, सरस्वती दिवटे, संगीता पंदिलवाड, स्वाती सुवर्णकार, रेणुका भिसे, डवरे, सेवक, शिंदे मामा, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील सुरेश पाईकराव, अतुल आडे, पोहरे, जाधव, गजानन तम्मलवाड आदी उपस्थित होते.