राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

भोकर :- हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणा स्रोत, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व युगपुरुष, युवा शक्तीची प्रेरणा स्वामी विवेकानंद यांच्या आज जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे त्यांच्या प्रतिमेस डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ शिल्पा कळसकर, डॉ अस्मिता भालके, डॉ मंगेश पवळे, आयुष डॉ विनायक थोरवट, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनोज पांचाळ, लिपिक प्रल्हाद आप्पा होळगे, परिसेविका उज्वला पवार, अधिपरिचारिका श्रीमती जिजा भवरे, साधना भगत, ज्योती शेंडगे, कक्षसेवक सतिश पोहरे व वाहन चालक परमेश्वर फनसवाड यांनी अभिवादन केले.