“पैशाचा चडला नाद” लोभ पैशाचा..आणि भोकर आरोग्य विभागातील कर्मचारी अडकला पैशाच्या नादात एसीबी च्या जाळत

भोकर तालुका प्रतिनिधी:भोकर येथील आरोग्य विभागात सेवकांचे बिल काढण्यासाठी येथील लेखापालने (कंत्राटी) सेवकाकडे ३००० रुपयेची लाच मागितली.पण तडजोडी करुन शेवटी १५०० रुपये लाच देण्याचे ठरले.दि.१९ डिसेंबर रोजी लेखापाल १५०० रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडून आरोपीस ताब्यात घेत त्यांच्यावर भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात माहिती अशी की भोकर येथील आरोग्य विभागात कार्यरत असलेले लेखापाल आशिष गंगाधर मोगले (कंत्राटी) याने कंत्राटी आरोग्य सेवकाचा मानधनाचे बिल काढण्यासाठी तीन हजार रुपयाची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसलेल्या सदर कर्मचाऱ्याने दिनांक ४ डिसेंबर रोजी लाच लुचपत विभागाकडे याप्रकरणी तक्रार दिली. तडजोडी आणती दिनांक १९ डिसेंबर रोजी १५०० रुपये लाच स्वीकारताना आशिष गंगाधर मुगले यास लाच रुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भोकर येथे पकडले. या प्रकरणी पोलीस भोकर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून लेखापालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार, पोलीस निरीक्षक श्रीमती माधुरी येवलीकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मांजरमकर, पो.हे काॅ. शेख रसूल, रापतवार, रमेश नामपल्ली यांच्या पथकाने हा सापळा रचून लेखापाल आषीश मोगले यांना रंगेहात पकडले या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Google Ad