श्री रामलला प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती निमित्ताने सामुहिक हनुमान चालीसा पठन व दीपोत्सव..
सेलु : तिथीनुसार श्रीराम मंदिर अयोध्या येथे रामलला च्या प्राणप्रतिष्ठा ला वर्षपुर्ती (एक वर्ष) पुर्ण झाल्यावर त्यानिमित्ताने ११ जनवरी शनिवार ला सेलू येथील हरदुलाल देवस्थान येथे सामुहिक हनुमान चालीसा पठन व दीपोत्सव चे श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समिती, वर्धा द्वारा आयोजन करण्यात आले. कार्यक्रम चे आयोजक जिला सहसंयोजक ओमदादा टवलारे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेलू पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा .श्री देवेंद्रजी ठाकूर, संजयजी जैसवाल, ओमदेवजी सावरकर, बेदरकर महाराज, मनोजजी केळझरकर व श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समिति, वर्धा चे जिल्हाध्यक्ष श्री रजतजी बत्रा, नितीनजी शेंडे, अमोलजी जुनघरे, अमितजी भुरे मनोहरजी पावडे ,सागर पोकळे ,अंकित सोरते, हेमंत कावळे, धीरज पवनारकर, खुश येलोरे,साक्षीताई दंडारे, प्राजक्ताताई दंडारे, स्वातीताई दंडारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच समस्त गावकऱ्यांनी ही उपस्थिती दर्शवली.