पानखेडा येथे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन-प्रा. मोतीलाल सोनवणे..


पानखेडा ता.साक्री जि.धुळे येथे दिनांक १३,१४,१५ जानेवारी २०२५ रोजी आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन थाटात संपन्न झाले.आदिवासी म्हणजे देशातील प्रथमचे रहिवासी,या भूमीवरील मूळ रहिवासी,मूळ भूमिपुत्र,जंगल जमीन पाणी यांचे मूळ मालक. आकाशाने फेकले धरतीने आम्हाला झेलले अशी त्यांची नितांत श्रद्धा असते आम्ही सर्व धरती मातीची लेकरे आहोत अशी त्यांची समजूत आहे.या संमेलनात गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश,कर्नाटक,मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा,पंजाब, राजस्थान,तामिळनाडू,त्रिपुरा, उत्तर प्रदेश या भागातील आदिवासी उपस्थित होते.
भारतात विविध राज्यात ४१४ विविध जमाती राहतात.उत्तर व पूर्व भारतात नागा,गारोखाशी, कुकी,थारू,लेपचा,गुज्जर इत्यादी जमाती आहेत.मध्य भारतात गोंड,मुंडा,बेगा,भुईया,कांद, भूमीज,खारीया, हो, संथाल, जुआंग, ठाकूर, वारली, कोळी, भिल्ल, कोलाम, चेंचू, कुर्ग, कादर, कुरुमन, कोलाम, पलियन, कुरुंबा इत्यादी जमाती राहतात.
महाराष्ट्रात आंध, बैगा, बावचा,बामचा,बरडा,भैना , भारिया,भात्रा, भिल्ल,पावरा, मुनिया, बिंझवार, धानका,तडवी, वळवी,धोडिया,दुबळा,गावित, मावची,पाडवी, गोंड,हलबा, कमार,कातकरी,कवर,खेबार, प्रवरिया, कोकणी, कोल, कोलारा,मन्नेरवारलू,कोळी, ढोर, टोकरे कोळी,कोलचा,कोलघा, कोळी महादेव,डोंगर कोळी, कोळी मल्हार,कोंध, कोरकू, कोया,नागेसिया,नाईकडा, ओराव,परधान,पारधी,वरजा, पटेलिया, सवर, राठवा,ठाकूर वारली,बिटोलिया ही यादी लोकसंख्येच्या क्रमाने पहावयाची झाली तर भिल्ल, वारली, गोंड, कोळी, कोकणा, ठाकूर आणि कातकरी असा क्रम घ्यावा लागेल.
भारतातील सर्व आदिवासी निसर्गाला देव मानतात.निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्यामुळे आदिवासींची स्वतःची संस्कृती निर्माण झाली आहे. निसर्गाला ते देव मानतात. वृक्ष, प्राणी,पक्षी, वनस्पती यांना देव मानतात. लिंगपूजा वृक्षपूजा देवतापूजा, प्राणीपूजा मर्तीका पुजा, जन्मोत्सव आणि विवाह बंधन, संसार, रूढी, परंपरा यांचे जतन करणारी जमात म्हणजे आदिवासी जमात होय.सूर्य चंद्र वृक्ष,नदी, नाले,खाडी,सागर, जंगले ही त्यांची दैवते आहेत. या आदिवासींमध्ये कामडी नृत्य, तारपा, ढोल, डांग्या गवली किंवा ढाका, धेडगा किंवा झाल नृत्य भोंडाई नृत्य, लेझीम, इत्यादी नृत्य करतात. वीर, वाघदेव डोंगऱ्या देवाची पूजा करतात.
या कार्यक्रमाला आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे,धुळे तालुका अध्यक्ष दिलीप शिरसाठ, नितीन नगरकर पैलवान, पोपटराव खैरनार,रघुनाथ मंडलिक,दीपक बोरसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad