संदीप भाऊ मित्र मंडळाच्या वतीने खासदार चषक २०२५स्व. खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मरणार्थ आमंत्रित सामन्याचे आयोजन…

भोकर(पत्रकार विजयकुमार मोरे कोळी)
येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संदीप भाऊ मित्र मंडळाच्या वतीने खासदार चषक २०२५स्व. खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मरणार्थ आमंत्रित टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला काँग्रेस पक्षाचे विधानसभा उमेदवार पप्पू पाटील कोंडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या सामन्याचे प्रथम बक्षीस एक लाख एक रुपये कै. वेंकट रेड्डी चेअरमन यांच्या स्मरणार्थ, द्वितीय बक्षीस 61,001 तौसीफ इनामदार राष्ट्रीय पक्षाचे शहराध्यक्ष यांच्या तर्फे, तृतीय बक्षीस 41 हजार एक नरेश उर्फ टील्लू पाटील गौड यांच्यातर्फे, चौथे बक्षीस 21 हजार एक मझर लाला यांच्यातर्फे, मॅन ऑफ सिरीज नईम पटेल तळेगावकर यांच्यातर्फे 11001, तर बेस्ट बॉलर पाच हजार एक शेख अतीफ दातार हार्डवेअर तर्फे, बेस्ट कीपर पाच हजार एक कै.शंकरराव जळबाजी चीट्टे यांच्या स्मरणार्थ आनंद पाटील चीट्टे यांच्यातर्फे, बेस्ट बॅट्समन साठी गुरू प्रसाद तिवारी यांच्या समर्थनार्थ दिलीप तिवारी, यांच्यातर्फे तर बेस्ट फिल्डरसाठी मारोती पवार देवठाणकर शिवसेना उबाठा गटप्रमुख, मॅन ऑफ द मॅच 5001 सय्यद जुनेद यांच्यातर्फे तर बेस्ट कॅच साठी पाच हजार एक श्रीपाद पाटील पारवेकर इत्यादी भव्य बक्षीसाचे आयोजन करण्यात आलेले आहे युवा नेतृत्व संदीप पाटील गौड दरवर्षी भोकर तालुक्यातील नवयुवक महाविद्यालयीन विद्यार्थी उत्कृष्ट क्रिकेटपटू घडावेत व देश पातळीवर आपल्या तालुक्याचे नाव उज्वल करावे या उद्देशाने क्रिकेट सामन्याचे आयोजन करत असतात या त्यांच्या उपक्रमांने भोकर तालुक्यातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच भोकर तालुक्यातील व शहरासह अनेक मान्यवर त्यांचे कौतुक करताना पाहायला मिळत आहे पुढील सतत असेच उपक्रम त्यांनी राबवावेत अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केल्या जात आहे 26 जानेवारी रोजी कै खा. वसंतरावजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ या भव्य दिव्य खासदार चषकाचे बक्षीस वितरण कै.खा. वसंतरावजी चव्हाण यांचे सुपुत्र नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय विद्यमान खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी या क्रिकेट सामन्याचा आनंद लुटावा असे आवाहन मुख्य आयोजक संदीप पाटील गौड यांनी केले आहे