मुंबईतील विक्रोळी गोदरेज जागेवर माता रमाई यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे

संदेश आंबेडकर यांची मागणी
मुंबई दि (प्रतिनिधी)भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज आणि देशासाठी प्रचंड योगदान दिले आहे, त्यांना आयुष्यभर साथ देणारी माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे मुंबईमध्ये विक्रोळी येथे भव्य दिव्य स्मारक उभे करण्यात यावे, अशी मागणी संविधान रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश आंबेडकर यांनी केली असल्याची माहिती समाजभूषण डॉ. राजन माकनीकर यांनी दिली आहे.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यभर साथ देणारी माता रमाई यांचे योगदान प्रचंड मोठे आहे. त्यांनी केलेला त्याग परिश्रम प्रचंड मोठे आहे. माता रमाई यांची जयंती जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली जाते. याही पेक्षा मोठ्या स्वरूपात जयंती साजरी व्हावी, त्यांच्या कष्टा ची महंती सर्वदूर पोहोंचावी. त्यांना स्मरण करण्यासाठी मुंबईमध्ये स्मारक उभे राहावे, अशी संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची मागणी आहे.
माता रमाबाईंचा त्याग हा संपूर्ण महिलांना कळावा एक आदर्श समाजासमोर उभा रहावा, यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण असल्याची माहिती बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू संदेश आंबेडकर यांनी दिली. याबाबत लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे माहिती संविधान रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक महासचिव डॉ. राजन मकणीकर यांनी दिली.