या प्रकरणाने साऱ्यांना आचार्य वाटलं आहे. तरुणाच्या घरच्यांनाही या घटनेने धक्का बसला आहे. त्यांचा यावर विश्वासच बसत नाहीये. मात्र दोघेही एकाच दिवशी गायब झाल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर हे दोघेही एकत्र पळून गेले ची माहिती मिळाली.
लग्नासाठी खरेदीला जात असल्याचे सांगून घरातुन निघाले…
लग्नासाठी कपडे खरेदीसाठी जात असल्याचे सांगून तरुण घरातून निघाला होता. त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला. वडील त्याला सतत फोन करत होते. मात्र मोबाईल बंद येत होता. यानंतर वडिलांनी सासरच्या घरी फोन केला तेव्हा त्यांना कळलं की मुलीची आई गायब झाली आहे. महिला गायब झाल्यानंतर जेव्हा मुलीच्या वडिलांनी कपाट तपासले तेव्हा त्यांना मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले दागिने आणि अडीच लाख रुपये गायब झाले असल्याचे दिसले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. महिला आणि तरुणाचा मोबाईल लोकेशन ट्रॅक केले जात आहे.