भोकर.तालुक्यातील रेणापूर व बटाळा गावातील सोळा शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था भोकर यांना निवेदन देऊन सामूहिक आत्मदहणाचा इशारा दिल्याने नागरिकांन मधे चर्चेला उधाण आले आहे.
सविस्तर वृत्त असे की रेणापूर या गावातील कापूस व्यापारी, प्रकाश बाबुराव बिरगाळे हा गेल्या पाच वर्षा पासून भोकर दिवशी रोडवर स्वतःच्या शेतात “विनापरवाना” कापूस खरेदी केंद्र चालू केले. या मधे प्रकाश रावांचा चांगलाच जम बसला या कामासाठी त्यांची पत्नी व मुलांचा ही सहभाग होता. बघता बघता परिसरात प्रकाशरावांचा चांगलाच बोलबाला झाला. रोज दहा वीस मजूर काम करू लागले दिवसातून पाच ते दहा गाडी कापूस खरेदी विक्री होऊ लागला. आणी अती विश्वासाने शेतकरी कापूस द्यायचे आणी महिना दोन महिन्या नंतर कापसाची रखम घेऊन जायचे, प्रकाशरावांनी रेणापूर येथे वीस पंचवीस लाख रुपये खर्च करून टूमदार बंगला बांधला, पण काय झाले कुणास ठाऊक 2024 मधे कापसाची जोरदार खरेदी केली.
आणी शेतकऱ्यांना पैशा साठी फिरवा फिरवी सुरु केली.
पैसे मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना उद्धट बोलणे सुरु केले. कोणी पैशा साठी तंबी दिली तर, आमच्या कडेच पैसे नाहीत कुठून द्यायचे, आले तेंव्हा देतो, आम्हाला काही बोलायचे नाही नाहीतर तुमच्या नावाने चिट्टी लिहून मी आत्महत्या करतो. अश्या प्रकारे धमकी देऊ लागले, म्हणून रेणापूर येथील काही शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्ग काढीत भोकर पोलिसात तक्रार दिली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बसून मिटवले शेतकऱ्याना पैसे देण्यासाठी तारीख देऊन प्रकाशराव व इतरांनी 100 रुपयांच्या बॉण्ड पेपर वर करार केला. करार करून 6 महिने उलटले परंतु एक नया पैसा मिळाला नाही.सहाय्यक निबंधक, मार्केट कमिटी, पोलिस स्टेशनं यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. पेरणी आली बिया भरणाची व्यवस्था नाही. कोणी कर्ज देत नाही.या विवंचनेत अडकलेल्या रेणापूर व बटाळा येथील सोळा शेतकऱ्यांनी आठ दिवसात पैसे न दिल्यास भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर राजेश मानपुरे,तुकाराम भगत, राजेश हमदं,अविनाश पेरकेलवाड, साईनाथ पेरकेलवाड,मानेजी कंधारे,गंगाधर पपुलवाड,साईनाथ मानपुरे,इब्राहिम पठाण, नारायण कोंडेवाड,दत्ता मानपुरे, बालाजी मानपुरे,गणपतराव हमदं सर्व राहणार रेणापूर व बालाजी गायकवाड, केशव पवार बटाळा या सोळा शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहणाचा इशारा दिला आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, तहसीलदार भोकर, पोलीस निरीक्षक भोकर, कृषिउत्पन्न बाजार समिती भोकर यांना दिल्या आहेत. संबंधित व्यापाऱ्यावर कार्यवाही होऊन शेतकऱ्यांना पैसे मिळतील की प्रशासन होणार आंदोलन बघतच राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे