भोकर :- आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 79 वा स्वातंत्र्य दिन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर व ग्रामीण रुग्णालय भोकरचे प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ अनंत चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्र पुरुष,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून, पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. डॉ अनंत चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत द्वारे सलामी देण्यात आली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दंत शल्य चिकित्सक डॉ मायादेवी नरवाडे मॅडम यांनी तंबाखू मुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा वाचन केले.

यावेळी डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर, ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील सर्व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply