ग्रामीण रुग्णालय भोकर येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन

भोकर :- दि. 14 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना नियमित सेवेत समायोजन करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झाला आहे सव्वा वर्ष कालावधी होऊन अजून पण राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी यांचे समायोजनचा शासन निर्णय घेत नाही तसेच मानधन वाढ, रॉयल्टी, बोनस, बदली धोरण मान्य होत नसल्याने तसेच मा.आरोग्य मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी दि. 8 व 10 जुलै 2025 रोजी संघटना शिष्टमंडळास समायोजन प्रक्रिया व विविध मागण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने दि.21 ऑगस्ट 2025 पासून ग्रामीण रुग्णालय भोकर येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होत आहेत. या बाबत डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी निवेदन दिले. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..