हत्तीरोग रुग्ण यांना दिव्यांग प्रमाणपत्र करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे तपासणी शिबीर संपन्न

 

भोकर :- हत्तीरोग रुग्ण यांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येत असून नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. राजाभाऊ बुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, डॉ अमृत चव्हाण जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड, डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या नियोजनानुसार दि. 28 ऑगस्ट रोजी हत्तीरोग रुग्ण तपासणी शिबीर ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दिव्यांग बोर्ड असल्याने येथे शिबीर आयोजित करण्यात आले. हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर, किनी, उमरी, धर्माबाद अंतर्गत गावातीत हत्तीरोग रुग्ण यांना तपासणी करण्यात बोलवण्यात आले होते. डॉ. संतोष अंगरवार सर्जन यांनी 19 हत्तीरोग रुग्ण यांची तपासणी केली त्यांना वर्गवारीनुसार ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालय भोकरचे आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, हत्तीरोगचे आरोग्य निरीक्षक व्यंकटेश पुलकंठवार, आरोग्य कर्मचारी गजानन कंकाळ, प्रदीप गोधने, अर्जुन सावंत, इंदूरकर, क्षेत्र कर्मचारी रामराव जाधव, गणेश गोदाम, राजू चव्हाण, रविंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर खोकले, इंदल चव्हाण, मारोती गेंदेवाड आदी उपस्थित होते.