धर्माबाद येथे अतिवृष्टीत सापलेल्या नागरिकांना सुरक्षा स्थळी नेण्याकरता चक्क उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी एन.डी.आर.एफ च्या टीमच्या ओडीत जाऊन केले रेस्क्यू
धर्माबाद येथे अतिवृष्टीत सापलेल्या नागरिकांना सुरक्षा स्थळी नेण्याकरता चक्क उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी एन.डी.आर.एफ च्या टीमच्या ओडीत जाऊन केले रेस्क्यू
उमरी ता प्रतिनिधी कैलास सोनकांबळे / दि.२७.२८.२९.ऑगस्ट रोजी जिल्ह्यात व धर्माबाद तालुक्यात धुवाधार झालेल्या पावसामुळे गोदावरी नद्यीचे पाणी पात्राबाहेर गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. आभाळ फाटल्याने शहर जलमय होऊन मोठे नुकसान झाले. शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली.
ढगफुटीसारखे पावसाने थैमान घातले असून सिरजखोड व कंदाकुर्ती पुलावरुन गोदावरी नद्यीचे पाणी जात आहे. तसेच छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले असून, मनूर, संगम, बामणी गावांचा संपर्क तुटला नदीकिनारी भागातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे
सतत तीन दिवसाच्या पावसामुळे धर्माबाद शहराचा आजूबाजूची गावे जलमय झाले आहे तालुक्यात पूरस्थिती गंभीर झाली आणि गावांचा संपर्क तुटला होता बहुतांश मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती यामध्ये मंगनाळी समराळा बाळापुर येथे पुराचे पाणी शिरल्याने आणि किरादुकान पाण्याखाली गेले असून घरे गोट्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती इथेही प्रशासनाच्या वतीने मदतीचा कार्य प्रगतीपथावर आहे
विशेष म्हणजे झालेल्या अतिवृष्टीमध्ये संपर्क तुटलेल्या गावांमध्ये धर्माबाद तालुक्यातील मनूर संगम बामणी या तीन गावाच्या संपर्क तुटला होता ह्या गावाचा संपर्क जोडण्याकरिता या गावातील नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी चक्क उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी एन.डी.आर.एफ. च्या ओडी मध्ये बसून संपर्क तुटलेल्या मनूर संगम बामणी संकटात सापडलेल्या नागरिकांना रेस्क्यू करून त्या नागरिकांना सुरक्षा स्थळी आणण्याचे काम स्वाती दाभाडे यांनी केले आहे या कार्यामध्ये धर्माबाद तहसीलच्या तहसीलदार सुरेखा स्वामी.
मंडळ अधिकारी अनिल लोहटे ग्राम महसूल अधिकारी नारायण गाजेवाड ग्राम महसूल अधिकारी माधव राऊत पोलीस निरीक्षक सदाशिव भाडीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे आधी आदींनी सहकार्य केले आहे.